Padalkar Vs Patil: भाजपच्या पडळकरांचा इशारा ठरला 'फुसका बार'; राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं धुराडं पेटलं

Rajaram Bapu Sugar Factory: भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना टार्गेट करताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी जतमधील साखर कारखान्यावरून जयंत पाटील यांना डिवचलं होतं.नुकतंच त्यांनी जतमधील साखर कारखान्यावरून जयंत पाटील यांना आव्हान दिलं होतं.
 Gopichand Padalkar and Jayant Patil
Gopichand Padalkar and Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News: भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना टार्गेट करून टीका करताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी जतमधील साखर कारखान्यावरून जयंत पाटील यांना डिवचलं होतं. नुकतंच त्यांनी जतमधील साखर कारखान्यावरून जयंत पाटील यांना आव्हान दिलं होतं. पण गोपीचंद पडळकरांचा (Gopichand Padalkar) हा इशारा फुसका बार ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

'तुम्हाला जतची इतकी चिंता आणि काळजी आहे तर मग जतच साखर कारखाना सभासदांना देऊन टाका. नाही तर मी जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनीट क्रमांक चारचे धुराडे पेटू देणार नाही,मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे,असा इशारा पडळकर यांनी दिला होता.पण पडळकरांचा हा इशारा फुसका बार ठरल्याचेच स्पष्ट झालं आहे.

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जत येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे गाळप हंगाम शनिवारी (ता.25) सुरू झाले आहे. शेतकरी व सभासदांच्या हस्ते यावर्षीच्या गाळप हंगामाचा शुभारंभ पार पडला. यावेळी या गाळप हंगामाच्या शुभारंभाला पडळकर विरुद्ध पाटील या संघर्षाची किनार होती.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कारखान्यावर गंभीर आरोप करत यंदा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नसल्याचा इशारा दिला होता. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना असून हा सभासदांचा कारखाना असून तो पुन्हा सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे,अशी भूमिका पडळकरांनी घेतली आहे.

 Gopichand Padalkar and Jayant Patil
BJP On Dhangekar: ...अखेर भाजपनं डोईजड झालेल्या धंगेकरांविरोधात पाऊल उचललंच, अडचणीत आणणारा 'तो' जुना घोटाळा बाहेर काढला

धक्कादायक बाब म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री कारखान्याचं राजारामबापू पाटील हे नाव बदलून रातोरात राजे विजयसिंह डफळे असे नामांतरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच गोंधळही उडाला होता. असं नाव कोणी लिहिलं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याचदरम्यान,आता आमदार गोपीचंद पडळकरांच्या आव्हानानंतरही साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्तानं पडळकर यांचा इशारा फोल ठरल्याची चर्चा सांगलीच्या राजकारणात जोरदारपणे सुरू आहे. तसेच पाटील आणि साखर कारखान्याबाबत येत्या काळात पडळकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 Gopichand Padalkar and Jayant Patil
BJP Politics : 'जेवढ्या वेगाने वर गेलो तेवढ्याच वेगाने खाली आपटू, भाजपमधील इन्कमिंगवर गडकरींची नाराजी'; बावनकुळे म्हणाले, आम्हाला...

जत येथील राजारामबापू पाटील सहकारी हा साखर कारखाना सभासदांना परत केल्याशिवाय तो सुरू होऊ देणार नसल्याचा इशाराही पडळकरांनी दिला होता. त्यामुळे आता कारखान्याच्या फलकावरील नाव कोणी बदललं हे अद्याप समोर आलं नसलं तरी या नाव बदलल्याच्या मुद्द्यावर पडळकर आणि पाटील या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com