Sahakarnagar Police Station Sarkarnama
पुणे

Pune BJP News : धंगेकरांची स्टंटबाजी थांबवा; भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलिस आयुक्तांची भेट

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार असतानाच पूर्व संध्येला भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस चौकीमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने पुणे पोलिस आयुक्त यांची भेट घेत रवींद्र धंगेकर यांची स्टंटबाजी थांबवावी, अशी मागणी केली आहे.

पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर धीरज घाटे (Dhiraj Ghate) म्हणाले, दोन महिन्यांपासून पुणे लोकसभेची निवडणुकीसाठी लोकशाही पद्धतीने प्रचार करून जनतेमध्ये उतरून आम्ही ही निवडणूक लढत आहोत. महायुतीचे (Mahayuti) कार्यकर्ते प्रचार सभा रॅली आणि घरोघर जाऊन प्रचार करत आहेत आणि उद्या मतदान असताना महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मात्र सहकार नगर पोलिस चौकीमध्ये जाऊन कांगावा करत आहेत.

या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय पक्का असल्याने रवींद्र धंगेकर यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कांगावा करून ते मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासोबतच पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने आम्ही पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.

पोलिस आयुक्तांनी याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अशाप्रकारे स्टंटबाजी करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा कांगावा त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी केला होता. त्याच प्रमाणे या निवडणुकीतही त्यांच्याकडून तोच प्रकार घडत आहे. मात्र मतदार हे ठाम असून महायुतीच्या उमेदवारालाच ते खासदार करणार असल्याचे घाटे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस नेत्यांकडून साड्यांचे वाटप

काँग्रेसचे काही नेते पुण्यामध्ये दाखल झाले असून त्यांच्या माध्यमातून गैरप्रकार घडत आहेत. साड्यांचे वाटप केले जात आहे. जेवणावळी घातल्या जात आहेत, असा आरोप देखील घाटे यांनी यावेळी केला.

(Edited By : Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT