Ravindra Dhangekar : विदर्भातील काँग्रेसच्या 'या' नेत्याचं रवींद्र धंगेकरांवर विशेष प्रेम!

Pune Loksabha Election : कसबा निवडणुकीत देखील दिली होती साथ आता लोकसभेसाठी देखील करताय सर्वोतोपरी मदत
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

Pune Political News : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील आमदारांची टीम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात अ‍ॅक्टीव्ह केली आहे. विदर्भातील हे 10 आमदार पुण्यातील विविध विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी पेलत आहेत. या आमदारातील एक आमदार धंगेकर यांच्या कसबा पोटनिवडणुकीच्या वेळी देखील धंगेकर यांच्या मदतीला धावून आला होता.

प्रेस कॉन्फरन्स, रॅली, सभा आणि निवडणुकीसाठी आवश्यक असलेली रसद पोहचवून कसबा पोटनिवडणुकीच्या विजयात धंगेकरांसाठी मोलाची कामगिरी बजावली होती. आता हेच आमदार धंगेकर यांच्या प्रेमापोटी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत फुल अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये काम करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Dhangekar
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेनंतर पुण्यातील 'आमचं ठरलंय'चा ट्रेंड कोणाला ठरणार फायदेशीर?

लोकसभा निवडणुकीत विदर्भामध्ये काँग्रेसला अच्छे दिन येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यात मतदान उरकल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्या ठिकाणच्या आमदारांची टीम बनून पुणे लोकसभेमध्ये ॲक्टिव्ह केली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हेवेदाव्यामध्ये न अडकतात प्रचार यंत्रणा कुठेतरी कमजोर होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. पाच दिवसांपासून ही टीम पुण्यामध्ये टळ ठोकून आहे.

या टीम मध्ये यशोमती ठाकूर नाना पटोले(Nana Patole), सुनील केदार अभिजीत वंजारी, विकास ठाकरे, धीरज लिंगडे, अमित झणक, राजू आवळे यांचा समावेश आहे. यातील यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

कसबा पोटनिवडणुकी वेळी सुनील केदार यांनी विशेष असं लक्ष घातलं होतं. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या समवेत मोठी रॅली कसबा परिसरात काढली होती. त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला होता. ती रॅली आणि त्यानंतर झालेली सभा ही कसबा पोटनिवडणुकीमध्ये गेमचेंजर ठरल्याचं बोललं जातं. त्याचबरोबर सुनील केदार यांनी पोटनिवडणुकीदरम्यान प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून वातावरण निर्मितीचे देखील काम केलं होतं.

Ravindra Dhangekar
Pune Lok Sabha Election 2024 : धंगेकर गिरवणार 'कसब्याचा कित्ता; निवडणूक आयोगाकडे घेतली धाव!

आता हेच सुनील केदार(Sunil Kedar) रवींद्र धंगेकर यांच्यासाठी खिंड लढवत असून वेळप्रसंगी त्यांनी अजित पवार यांना देखील अंगावरती घेऊन टीका केली आहे. पुण्यात राहून धंगेकरांसाठी अगदी बुथ पातळीवर जाऊन मायक्रोप्लॅनिंग करत आहेत. निवडणुकीसाठी लागणारी अन्य रसद देखील पुरवत आहेत. या सुनील केदार यांच्या मदतीचा धंगेकरांना किती फायदा होणार हे 4 जूनला स्पष्ट होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com