Ravindra Dhangekar News : आमदार धंगेकरांचा चौकीत ठिय्या; घराघरात पैसे वाटतं असल्याचा आरोप...

Political News : मतदानाच्या पूर्वसंध्येला सहकार नगर परिसरामध्ये भाजपकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस चौकीमध्ये ठिय्या मांडला.
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच मतदानाच्या पूर्वसंध्येला सहकार नगर परिसरामध्ये भाजपकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस चौकीमध्ये ठिय्या मांडला. त्यासोबतच संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

मतदानाच्या पूर्वसंध्येला सहकार नगर परिसरामध्ये घराघरात जाऊन पैसे वाटप करण्यात येत असताना पोलीस मात्र याबाबत कोणतीही कारवाई करत नाहीत. पोलीस चौकीमध्ये आराम करत बसले असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. (Ravindra Dhangekar News)

Ravindra Dhangekar
Pune Lok Sabha: मतदानापूर्वी निवडणूक आयोगाने घेतले 'हे' तीन महत्त्वपूर्ण निर्णय

कोणतीही कारवाई पोलिसांकडून केली जात नसल्याचा देखील धंगेकर यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत कोणी चौकीतच ठिय्या मांडणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे नितीन कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर काढणार आणि त्याचा वापर पुण्याच्या निवडणुकीमध्ये करणार असल्याचा आरोप कालपासून करत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी रवींद्र धंगेकर यांनी आयोगाला पत्र लिहीत पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चारही मतदारसंघात निवडणूक आचार संहिता ढाब्यावर बसवून झोपडपट्टी भागात सर्रास दारू व पैसे वाटप होत आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेले अनेक गुन्हेगार सद्यस्थितीत नागरिकांना धमकावत असून मतदान करण्यास प्रतिबंध करत आहेत, असे निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात धंगेकरांनी म्हटले आहे.

पर्वती, कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर या मतदारसंघात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवून, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आचारसंहिता पथके कार्यरत ठेवावीत. मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत होणारी बेकायदेशीर मतदार वाहतूक हा पुणे लोकसभा मतदारसंघाचा दुर्दैवी इतिहास आहे, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केले आहेत.

(Edited By : Sachin Waghmare )

Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar : विदर्भातील काँग्रेसच्या 'या' नेत्याचं रवींद्र धंगेकरांवर विशेष प्रेम!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com