Ravindra Dhangekar, Balasaheb Dabhekar Sarkarnama
पुणे

Kasba By-Election : कसब्यातून बाळासाहेब दाभेकरांची बंडखोरी; आता काँग्रेसची डोकेदुखी वाढली

Pune Congress : उमेदवारीवरून झालेल्या नाराजीमुळं कसब्यात भाजप, काँग्रेसचं टेन्शन वाढलं

सरकारनामा ब्युरो

Pune Political News : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आता नवनवीन ट्विस समोर येत आहेत. त्यामुळं कसबा पोटनिवडणुकीची रंगत वाढत आहे. कसब्यातून भाजपने हेमंत रासने यांना तर महाविकास आघाडीतून काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान काँग्रेसमधून इच्छुकांची यादी मोठी होती. त्यात काँग्रेसचे जुने सभासद बाळासाहेब दाभेकर यांचाही सहभाग आहे. धंगेकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता दाभेकर यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे. दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज नेला असून उद्या ते अर्ज दाखल करणार आहेत.

पोटनिवडणूक लागताच महाविकास आघाडीतील काँग्रेसने (Congress) कसबा मतदार संघावर (Kasba) हक्क सांगितला. ही जागा लढविण्यासाठी काँग्रेसमधून अनेक इच्छुक असल्याचे समोर आले होते.

या मतदार संघाचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांनी काही दिवसांपूर्वी इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यात १६ जणांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यासह बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनीही मुलाखत दिली होती. तसेच तत्पुर्वी दाभेकर यांनी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचे सांगून मिसळपावची मेजवानीही दिली होती.

यापूर्वी दाभेकर यांनी वारंवार कसब्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे वेळोवेळी विविध कारणं देत दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेस उमेदवारी देईल, अशी आशा दाभेकर यांना होती. मात्र महाविकास आघाडीच्या वतीने लढविण्यात येणारी ही जागेवर काँग्रेसने धंगेकर यांना उमेदावारी जाहीर केली आहे.

दरम्यान धंगेकर यांना उमेदवारी दिली तर बंडखोरी करणार, असा इशारा बाळासाहेब दाभेकर यांनी दिला होता. त्यानुसार या निवडुकीत धंगेकर यांना पाठींबा देणार नाही, असे म्हणत दाभेकर यांनी बंडखोरी केली आहे. दाभेकर यांनी आज अर्ज नेला आहे. ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं उमेदवारीवरुन आता भाजपसह काँग्रेसपक्षातीलही अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) हे १९७६ पासून काँग्रेसचे सभासद म्हणून पुणे शहरात कार्यरत आहे. ते काँग्रेसचे निष्ठावान म्हणून प्रचलित आहेत. त्यांनी यापूर्वीही कसबा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांना विविध कारणांनी उमेदवारी दिली गेली नाही. आताही त्यांच्याऐवजी धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर दाभेकरांनी बंडखोरी केल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT