Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama

Amit Deshmukh : काँग्रेसचे अमित देशमुख नाराज, काय आहे कारण?

Amit Deshmukh : अशा प्रकारामुळे जिल्ह्याचा विकास होत नाही.
Published on

Amit Deshmukh : लातूर (Latur) जिल्ह्यातला ग्रामीण पट्ट्यातला विकास हा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केला जातो. जिल्हा नियोजन समितीमार्फत २०२२-२३ या कालावधीसाठी ३०२ कोटी रूपयांच्या निधीचा तरतूद करण्यात आली.मात्र, आता फेब्रुवारी अर्धा महिना संपत आला, तरी आजपर्यंत फक्त ५९ कोटी ७३ लाखांच्या निधीचे जिल्ह्यासाठी वितरण झाले. त्यापैकी, फक्त ३९ कोटी ६८ लाख एवढाच निधी खर्च करण्यात आला आहे.

जिल्ह्यासाठी निधी खर्च करण्यात प्रशासनाकीडून उदासीनता दिसून येत आहे. आता बाकी राहिलेला निधी मार्च अखेरीपर्यंत खर्च नियोजनाचं आव्हान प्रशासनाकडे आहे. जिल्ह्यांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या तिजोरीतून प्रतिवर्षी निधी वितरीत केला जातो. जिल्ह्याचा वर्षभराचा विकास आराखडा हा जिल्हा नियोजन समितीकडून तयार केला जातो.

यासाठी जिल्हा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची समितीची स्थापना होत असते. या समितीत आमदार (mla), खासदारांचा समावेश होऊन समिती तयार केली जाते. २०२२-२३ मध्ये जिल्हा परिषद सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य यांची वर्षासाठी जिल्हा नियोजन समिती तयार करण्यात आली आहे. मार्चपर्यंत या माध्यमातून ३०२ कोटींची तरतूद खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५९.७३ लाखांचे वितरण झाले आहे. १९.७७ टक्के इतकाच खर्च करण्यात आला आहे.

निधी खर्च न करणे, ही फारच दुर्दैवाची बाब आहे. अशा प्रकारामुळे जिल्ह्याचा विकास होत नाही. अनेकदा ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली, पण सरकारची उदासीन मानसिकता कायम तसेच आहे. शासनाला याचा जाब जनतेला द्यावं लागणार, असल्याचे माजी पालकमंत्री तथा (latur) आमदार अमित देशमुख स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com