Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांची पत्नी सुनेत्रा पवार Sunetra Pawar या उमेदवार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून आहेत. यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या परिसरामध्ये छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे NCP आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. Latest Update on Pune Lok Sabha News
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आज पुणे दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी रोहित पवार म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे Supriya Sule यांना तीन लाखाचं मताधिक्य मिळणार आहे. खडकवासला परिसरात फिरत असताना मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदा खडकवासला मतदारसंघात Khadakvasala Constituency देखील आम्हाला मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळणार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा मताधिक्य चार लाखांपर्यंतदेखील जाऊ शकते ही निवडणूक सामान्य लोकांनी आपल्या हातात घेतलेली आहे. Loksabha Election 2024
आमच्या मोठ्या नेत्यांना सोसायट्यांमध्ये जाऊन प्रचार करत नाहीत तर ते महाराष्ट्रभर फिरत आहेत. ते तिथे जाऊन महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi इतर उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. मात्र, इथे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात असलेल्या पक्षाचे सर्व नेत्यांना सोसायटी लेवलला जाऊन प्रचार करावा लागत आहे. भाजपमुळे दादांवर अशी परिस्थिती आली आहे, असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला. Rohit Pawar On Ajit Pawar NCP
'काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना नेत्यांना दमदाटी होत असल्यामुळे ते नेते अजित पवारांसोबत जात आहेत. मात्र, सामान्य नागरिक आमच्यासोबत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही लढाई परिवाराची नाही तर राहुल गांधी Rahul Gandhi विरुद्ध मोदी अशी असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं होतं. याबाबत रोहित पवार म्हणाले, ही लढाई भाजपविरोध महागाई आणि सामान्य लोक अशी आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते काय म्हणतात यापेक्षा जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं असल्याचं' रोहित पवार यांनी सांगितलं.
खडकवासला परिसरामध्ये अजित पवार यांनी माझ्या बायकोला निवडून दिलं तर माझा तुम्हाला फायदा होईल, असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत रोहित पवार म्हणाले, 'अजितदादांच्या या वक्तव्याविरोधात आम्हाला पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं लागेल. या माध्यमातून एक प्रकारे तुम्ही लोकांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात. या पदाचा वापर करून तुम्ही दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र, अजित पवारांना मला सांगायचं आहे की, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये बहुतांश महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार असून, पुढील चार महिन्यांमध्ये राज्यातदेखील महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे तुम्ही पालकमंत्री नसणार आहात. त्यामुळे नागरिकांची कामं आम्हीच करणार', असल्याची टीका रोहित पवारांनी केली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.