Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू आहे. शिवाय लोकसभेसाठीचं (Lok Sabha) पहिल्या टप्प्यातील मतदानदेखील पार पडलं आहे. उर्वरित मतदान टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं जात आहे. शिवाय निवडणूक आयोगाकडूनही (Election Commission) नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जनजागृती केली जात आहे.
अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक तरुण स्वित्झर्लंडवरून सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी आल्याचा दावा केला आहे. तसेच महाराष्ट्राचं आणि बारामतीचं नाव हे केवळ पवार साहेबांमुळेचं जगात आहे अशी कृतज्ञतेची भावना या तरुणाने व्यक्त केल्याचंही पवार यांनी सांगितलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रोहित पवारांनी या तरुणाबरोबरचा आपला एक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. "केवळ पवार हेच साहेबांचं (Sharad Pawar) कुटुंब नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हे साहेबांचं कुटुंब आहे. याच कुटुंबातील एक सदस्य संदीप परखंदे (Sandeep Parkhande) हे लोकसभेच्या निवडणुकीत पवारसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत सुप्रियाताईंना मतदान करण्यासाठी स्वित्झर्लंडवरून (Switzerland) आले. त्यांची काल भेट झाली. आज महाराष्ट्राचं आणि बारामतीचं नाव हे केवळ जगात पवार साहेबांमुळेचं आहे, अशी कृतज्ञतेची भावना या वेळी त्यांनी व्यक्त केली."
तसेच या व्हिडिओत बोलताना रोहित पवार म्हणाले, संदीपभाऊ स्वित्झर्लंमध्ये एका कंपनीत काम करतात. परंतु सध्या ते एका महिन्याची सुटी काढून भारतात आले आहेत. कुटुंबीयांना भेटण्यासह ते आवर्जून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले आहेत. शिवाय त्यांनी आपल्या मित्रांना विनंती केली आहे की, पवारसाहेबांबरोबर राहा आणि तुतारीला मतदान करा.
शरद पवारसाहेबांमुळे त्यांच्या शिक्षणाला कधीकाळी मदत झाली होती. याची जाणीव ठेवून निष्ठेने ते मतदान करण्यासाठी आले आहेत. प्रचारादरम्यान अशा गोष्टी बघितल्यानंतर आमची जबाबदारी किती मोठी आहे याची जाणीव होते, असं रोहित पवार म्हणाले. तर या वेळी संदीप परखन्दे म्हणाले, "पवारसाहेब नसते तर शेतकऱ्याचा पोरगा हिंजवडीत शिकला नसता आणि महाराष्ट्राचं नाव जगात झालं नसतं म्हणून पवारसाहेब आणि तुतारीच."
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.