Parth Pawar, Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar News : पार्थ पवारांच्या मागे-पुढे दोन रणगाडे द्यावेत; रोहित पवार नेमके काय म्हणाले?

Parth Pawar Security : खासदार सुप्रिया सुळेंनी युगेंद्र पवार आणि रोहित पवारांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती, तर काही दिवसांपूर्वी पुणे पोलिस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढलेली आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकारने 'वाय प्लस' दर्जाची सेक्युरीटी देण्याचा निर्णय घेतला आहे. पार्थ हे आई सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करतात. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर त्यांनी भर दिला असून, कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधत आहेत.

याच पार्श्वभूमीवर पार्थ यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी समाचार घेतला आहे. वाय प्लस नाही तर त्यांच्या मागे पुढे दोन रणगाडे दिले पाहिजेत, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. Rohit Pawar Taunts State for Parth Pawar Security.

मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्राचार करताना पवार बोलत होते. या वेळी पार्थ यांना दिलेल्या सुरक्षेबाबत छेडले असता रोहित पवार Rohit Pawar म्हणाले, त्यांना वाय प्लस नाही तर झेड सुरक्षा द्यायला हवी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी सुरक्षा आहे तीच द्यायला हवी होती. सागर बंगल्यातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेत्याला सुरक्षा देतात, त्यांच्या मुलाला सुरक्षा देतात. आमदारांना सुरक्षा देतात, मात्र कोयत्या गँग ही उघडपणे फिरते, महिलांवर अत्याचार होतात, तसेच गोळीबाराचे प्रकारही राज्यात घडले आहेत. त्यामुळे सामान्य लोकांची अडचण वाढते. याकडे मात्र त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीकाही पवारांनी केली.

पार्थ पवार Parth Pawar हे बारामती लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी जाऊन सुनेत्रा पवारांचा प्रचार करतात. यामुळे त्यांना सुरक्षा दिल्याचे बोलले जाते. त्यावर रोहित पवार म्हणाले, पार्थ पवारांच्या पुढे - मागे दोन रणगाडे दिले तरच त्याचा फायदा होईल. कारण सामान्य लोक हे महायुती आणि भाजपच्या विरोधात आहेत. भाजपच्या कृतीमुळे त्यांचेच कार्यकर्तेही नाराज झालेले आहेत. त्यातूनच तेच काहीतरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा दिलेली असावी, असा टोलाच रोहित पवारांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळेंनी Supriya Sule पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवारांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, या दोघांना अद्यापही कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच पुणे पोलिस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढलेली आहे. पार्थ पवारांना मात्र राज्य सरकारने थेट वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी दिल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT