Umesh Patil News: जानकर हे किती लबाड अन् फसवे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले...!

Umesh Patil on Uttam Jankar:धनगर समाजावर मोहिते पाटलांनी पिढ्यान् पिढ्या अन्याय केला. त्याचा उठाव म्हणून तेथील जनता जानकरांच्या पाठीशी होती. त्या जनतेला वाऱ्यावर सोडून जानकर हे मोहिते पाटलांकडे गेले, त्यामुळे तेथील जनता जानकरांच्या पाठीशी जाणार नाही.
Umesh Patil on Uttam Jankar
Umesh Patil on Uttam JankarSarkarnama
Published on
Updated on

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधील वजनदार नेत्याला फोडून उमेदवारी दिल्यानतंर आता शरद पवारांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत. या मतदारसंघातील धनगर समाजातील वजनदार नेते उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सहभागी झाले आहेत.

अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी शरद पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तम जानकरांनी "अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी करतो," असे वादग्रस्त विधान केले आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी उत्तर दिले आहे.

अजितदादाबद्दल बोलावं एवढी जानकरांची पात्रता नाही, धनगर समाजावर मोहिते पाटलांनी पिढ्यान् पिढ्या अन्याय केला. त्याचा उठाव म्हणून तेथील जनता जानकरांच्या पाठीशी होती. त्या जनतेला वाऱ्यावर सोडून जानकर हॆ मोहिते पाटलांकडे गेले, त्यामुळे तेथील जनता जानकरांच्या पाठीशी जाणार नाही. त्यामुळे उत्तम जानकर हे किती लबाड आणि फसवे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असे उमेश पाटील यांनी सांगितले.

अजितदादांना पक्षातून हकालपट्टी करतोस असे डोक्यावर परिणाम झालेले विधान उत्तम जानकर यांनी केले आहे. जानकरांसाठी ज्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या त्या कार्यकर्त्यांना सोडून आमदारकीसाठी उत्तम जानकर हे मोहिते पाटलांकडे गेले आहेत, असा टोला उमेश पाटील यांनी लगावला आहे.

बारामतीची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (sharad pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे.

Umesh Patil on Uttam Jankar
Imran Pratapgarhi News: मोदीजी बाय बाय...शायरी म्हणून ठीक, पण जमिनीवर नियोजन काय?

काय म्हणाले आहेत उत्तम जानकर

"अजितदादा हे शरद पवारांनी लावलेलं रोपटे आहेत. बारामतीचा किल्लेदार म्हणून अजिदादांना नेमलं होतं. आता किल्लेदार फितूर झाले आहेत. किल्ला एकदा हातातून जाऊ शकतो. मात्र, यंदा शरद पवार सावध आहेत."

"हात घड्याळ्यात अडकलाय, असं काही नाही. मी अजितदादांच्या राष्ट्रवादीत असून, पक्ष सोडलेला नाही. अजितदादांच्या पराभवात माझाही हातभार असेल. त्यानंतरच पक्ष सोडेन. अजितदादांनी जसं शरद पवारांना पक्षातून काढून टाकलं, तसं मला काढलं, तर मी अजितदादांना काढून टाकेल."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com