Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar Predictions : आगे आगे देखो होता है क्या'; पिंपरी, भोसरीतील राजकीय उलथापालथीचे रोहित पवारांकडून संकेत

Pimpri-Bhosari Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये इन्कमिंग वाढले आहे. पिंपरी आणि भोसरीमध्ये 20 तारखेला मोठा राजकीय बदल दिसणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Pradeep Pendhare

Pune, 09 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये इन्कमिंग वाढले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांचा कॉन्फिडन्स भलताच वाढला आहे. "पिंपरी, भोसरीमध्ये 20 तारखेला काय होतंय, हे तुम्ही पहालच. आगे आगे देखो होता है क्या!", अशी डायलॉगबाजी करत आमदार रोहित पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी फोडाफोडीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर मिळेल, असा इशाराच दिला.

शरद पवार यांच्या उपस्थितीत गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये इन्कमिंग वाढले आहे. विशेष करून अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) संपर्कात असलेले नेते, कार्यकर्ते शरद पवारांकडे येत आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दबदबा वाढला आहे. यातच निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला आणि त्यांच्या 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हाला अधिकृतरित्या मान्यता दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यावर वेठीस धरून चांगले जेरीस आणत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ग्राउंड लेव्हलवर पक्ष विस्ताराचे धोरण हाती घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाला राज्यात 8 जागा मिळाल्या. त्यामुळे शरद पवार यांचा कॉन्फिडन्स देखील वाढला आहे. यावेळी राज्यात सत्तांतर करायचेच, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. यातून त्यांनी सूत्रं हलवायला सुरुवात केली आहे. दुष्काळी दौरा, शेतकरी मेळावा यानंतर आता राज्यातील युवकांच्या गाठीभेटीवर शरद पवार भर देताना दिसत आहेत.

शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीची बांधलेली मोट यशस्वी होताना दिसत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंघ राहण्यासाठी शरद पवारदेखील प्रयत्न करत आहेत, यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा परफॉर्मस आणि स्ट्राईक रेट वाढताना दिसतोय. त्यामुळे पक्षाच्या आमदारांचा कॉन्फिडन्स देखील वाढला आहे.

आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मोठा दावा केला आहे. पिंपरी आणि भोसरी येथे 20 तारखेला काय होतंय हे तुम्ही पाहतच राहा. 'आगे आगे देखो होता है क्या!' अशा डायलॉगबाजीमध्ये पिंपरी आणि भोसरीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT