Rohit Patil : "पहिलवान छोटा असो किंवा मोठा चितपट करणारच", रोहित पाटलांनी थोपटले दंड

Rohit Patil in Tasgoan Assembly Election : रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या मैदानावर शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
Rohit Patil
Rohit PatilSarkarnama

Sangli Political News : उद्याच्या निवडणुकीत रोहित पवार यांना साथ द्या, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केली.

तर, कुठलाही मोठा पहिलवान उभा राहिला, तर चितपट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं म्हणतं रोहित पाटील यांनीही दंड थोपटले आहेत. त्यामुळे रोहित पाटील हे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून लढणार असण्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाला आहे. आता रोहित पाटील यांच्यासमोर पैलवान कोण आणि किती शक्तिशाली असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या मैदानावर शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रोहित पाटलांच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन शरद पवार (Sharad Pawar) यांनी जनतेला केलं.

Rohit Patil
Vishal Patil : विशाल पाटलांना मंत्र्यानं दिली थेट भाजपात येण्याची ऑफर, अन् मग...; नेमकं काय घडलं?

"आर. आर. पाटलांच्या निधानाची रूखरूख आजही मनात"

"प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून नाव कमवलं. काही वर्षांपूर्वी ते आपल्याला सोडून गेले. आर. आर. पाटील यांच्या निधनाची रूखरूख आजही माझ्या मनात घर करून आहे. आर. आर. पाटील यांची कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या विधानसभेत तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. जनतेनं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे," असं शरद पवार यांनी म्हटलं.

"पहिला विजय आपला"

रोहित पाटील (Rohit Patil) म्हणाले, "कवठेमहांकाळ शहरात आणि तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पण, माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यासमोर छोटा किंवा मोठा पहिलवान उभा राहिला तरी, त्या पहिलवानाला चितपट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार तासगावमधून निवडून येईल."

"शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही"

"तासगाव आणि कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ हा प्रगतशील होण्यासाठी आपण आणि सुमनताई पाटील प्रयत्न करत आहोत. तसेच, या मतदारसंघात शक्तीपीठ महामार्ग होऊ नये. तो झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरू," असा इशारा रोहित पाटलांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com