MLA Mahesh Landge, MLA Rohit Pawar Latest News Sarkarnama
पुणे

रोहित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगेंची भेट घेवून केलं सांत्वन...

Mahesh Landge : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लांडगेंचे सांत्वन केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे अध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे ( वय ६५ वर्षे, रा.भोसरी) यांचे गेल्या महिन्यात २४ तारखेला अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यानंतर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राज्यभरातून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची रांग गेले तीन आठवडे सुरुच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) कर्जत-जामखेडचे (जि.नगर) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज (ता.१३) आमदार लांडगेंची त्यांच्या भोसरीतील घरी जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले. (MLA Mahesh Landge, MLA Rohit Pawar Latest News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लांडगेंचे सांत्वन केले आहे. तर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींसह राज्यभरातील विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आ. लांडगेंच्या कुटुंबाला भेटून गेले आहेत. आमदार रोहित पवार हे आज सकाळीच आ. लांडगेंच्या निवासस्थानी आले. राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख तसेच विराज लांडे हे त्यांच्यासोबत होते. त्यांनी आ. लांडगेंचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला. त्यानंतर अनौपचारिक चर्चा करीत त्यांना काहीसे त्या वातावरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला.

आमदार लांडगेंनी दीड कोटी रुपयांची बक्षीसे असलेली देशातील सर्वात मोठी बैलगाडा यावर्षी २८ ते ३१ मे दरम्यान भरवली होती. तिचा उल्लेख करीत बक्षीस असलेला जेसीबी, ट्रॅक्टर कुणी पटकावला अशी उत्सुकतेने विचारणा रोहित यांनी करीत वातावरण काहीसे हलके करण्याचा प्रयत्न केला.आम्ही काही एवढं व असं बक्षीस देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक कधी होऊ शकते, याचा कानोसा त्यांनी घेतला. त्या प्रश्नावर ही निवडणूक येत्या मार्चमध्ये होईल,असा अंदाज लांडगेंनी व्यक्त केला.

दरम्यान, लांडगेंच्या भेटीनंतर रोहित यांनी दसऱ्याच्या आदल्या दिवशी अपघातात गंभीर जखमी झालेले मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील कार्यकर्ते तानाजी भोसले याची थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. ते बेशुद्धावस्थेत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांनी माहिती घेतली. त्यांना योग्य ते उपचार करण्यास सांगितले. तानाजीच्या आईवडिलांना भेटत त्यांनाही रोहित यांनी धीर दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT