पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यावर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं सोबतच शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांच्या गटाने आम्हीच खरी शिवसेना आणि पक्ष चिन्हही आम्हालाच मिळावं, अशी निवडणुक आयोगाकडे मागणी केली आहे. यामुळे अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचं नवं नाव आणि पक्ष चिन्ह देण्यात आलं आहे.
दरम्यान, पक्षाच्या चिन्हाचं महत्व लक्षात घेता दोन्ही बाजूने धनुष्यबाण मिळवण्यासाठी निवडणूक आयोगात मोठा आटापिटा केला जात आहे. मात्र, पुरंदर तालुक्यातील दादा जाधवराव यांनी एकाच पक्षाकडून सात वेळा सात वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवत ते आमदार झाले होते. आज घडीला शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेल्या चिन्हाच्या वादावर दादा जाधवराव यांनी मिळवलेल्या विजयाचे उदाहरणं हे उमेदवार सक्षम असेल तर पक्षचिन्हामुळे फार काही फरक पडत नाही, असेच सांगते.
पुरंदर तालुक्यातील दादा जाधवराव यांचा पक्ष एकच होता पण कालांतराने त्यांची जनता पक्ष, जनता दल, जनता सेक्युलर, अशी नावे बदलत गेली. तसेच चिन्हेही बदलत गेली. समाजवादी विचारांशी त्यांची बांधिलकी होती. दादासाहेबांनी पहिली निवडणूक 1972 साली झोपडी चिन्हावर लढली. 1978 साली नांगरधारी शेतकरी हे चिन्ह मिळाले. 1980 साली छत्री हे चिन्ह मिळाले. 1985 साली नांगरधारी शेतकरी हे चिन्ह मिळाले. 1990 व 1995 साली चक्र हे चिन्ह मिळाले. त्यानंतर ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी हे चिन्ह मिळालं. त्यानंतर डोक्यावर भारा घेतलेली महिला हे चिन्ह त्यांना मिळाले. दादासाहेबांनी अशा विविध चिन्हांवर निवडणुका लढवल्या आणि विशेष म्हणजे त्या जिंकल्याही. मात्र ते बदललेल्या चिन्हामुळे कधी नाराज झाले नाहीत, असे त्यांचे चिरंजीव बाबाराजे जाधवराव यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.
दरम्यान, शिवसेनेचा नाव आणि पक्षचिन्हाचा वाद अद्यापही निवडणूक आयोगामध्ये प्रलंबित आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला पक्षाचे नवीन नाव आणि नवे चिन्ह देण्यात आलं आहे. यामुळे यावरून राज्यभर चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर दादासाहेब जाधवरावांच उदाहरणं शिवसेनेतील दोन्ही गटांतील कार्यक्षम आमदारांना उर्जा देणारेच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.