Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar on Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर'ची रोहित पवारांनी उडवली खिल्ली; म्हणाले 'आता ऑपरेशन कुत्रा, मांजर...'

Rohit Pawar on Mahayuti Government : सध्या सरकारमध्ये तीन वाघ मात्र ते एकामेकाशीच भांडत आहेत, असाही टोला महायुती सरकारला रोहित पवारांना लगावला.

Sudesh Mitkar

Pune News : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये 'ऑपरेशन टायगर'ची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लॉन्च केलेल्या या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नाराज नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आतापर्यंत ठाकरे गटातील काही दिग्गज नेते या ऑपरेशन अंतर्गत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.

तसेच आगामी काळात आणखी अशाच प्रकारचे प्रवेश होणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी या ऑपरेशनची खील्ली उडवली आहे.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार म्हणाले, सध्या राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. त्यामध्ये ऑपरेशन टायगर सध्या सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र यापुढे ऑपरेशन मांजर आणि त्यानंतर ऑपरेशन कुत्रादेखील सुरू होईल. मात्र अशा प्रकारची किती ऑपरेशनं सुरू करण्यात येतील हे आपल्याला पाहावं लागेल.' असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला.

ज्याप्रमाणे एखादं प्राण्यांचं संग्रहालय असतं त्या संग्रहालयामध्ये जर वाघांना एकत्र ठेवलं तर ते एकमेकांशी भांडतात, तसंच कुत्र्यांना देखील एकत्र ठेवल्यास ते देखील आपसात भांडतात. कोल्ह्यांच्या बाबतीत देखील तीच परिस्थिती असते. सध्या राज्यातील चित्र पाहिलं तर सरकारमध्ये तीन वाघ आहेत.मात्र हे तिन्ही वाघ सध्या एकामेकाशीच भांडताना जास्त दिसत आहेत. असं म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis),उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना नाव न घेता टोला लगावला.

रोहित पवार पुढे म्हणाले , हे प्राणी संग्रहालय काढण्याचा प्रयत्न भाजपा(BJP) आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून केला जात आहे. यामुळे इतकी लोक त्यांच्या संग्रहालयात म्हणजेच पक्षात जातील ज्यातून त्यांच्यातल्या त्यांच्यातच भांडण लागतील असं मला वाटत आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर सारखे गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात. मात्र या ऑपरेशनमुळे पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांवर अन्याय होतो असं आपलं मत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT