Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Baramati Pawar Sabha : सुळेंच्या प्रचारसभेत 'तो' व्हिडिओ लावून रोहित पवारांनी केली अजिदादांची कोंडी

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत आमदार रोहित पवारांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत सभा गाजवली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi, मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, रविराज तावरे आणि सर्वात शेवटी अजित पवारांचाही व्हिडिओ लावला. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांचा रोहित यांनी समाचार घेतला तर अजितदादांचा व्हिडिओ दाखवून त्यांची कोंडी केली.

रोहित पवार म्हणाले, सुप्रिया सुळेंना Supriya Sule लिड द्यायला बारामतील लोकसभेतील सर्व विधानसभा मतदारसंघ तयार आहेत. आजपर्यंत पुरोगामी विचाराला सर्वात जास्त लिड बारामतीकरांनी दिले आहे. 2019 मध्ये सुप्रिया सुळे यांना भाजपच्या उमेदवाराविरोधात एक लाख 20 हजारांचे लिड दिले होते. विधानसभेत अजितदादांनाही भाजपच्या उमेदवाराविरोधातच एक लाख 65 हजारांचे मताधिक्य दिले होते, याची आठवणही रोहित पवारांनी करून दिली.

आता दादा Ajit Pawar आपल्यासोबत नाहीत. ते आपले साम्राज्य टिकवण्यासाठी भाजपसोबत गेले आहेत. भाजपविरोधात तुम्ही त्यांना मोठ्या मताधिक्य दिले, आता भाजपसोबत जाताना त्यांनी तुम्हीला विचारले का, असा प्रश्नही रोहित यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता आपल्या बारामतीकरांची जाबाबदारी वाढली आहे. तुम्ही गेल्या 60 वर्षांत भाजपच्या उमेदवाराविरोधात पुरोगामी विचारांच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य दिले आहे. तेच उत्तर या लोकसभेत द्यायचे आहे, असे आवाहनही रोहित पवारांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहित पवारांनी Rohit Pawar सुप्रिया सुळे यांचा विजय होण्यासाठी एका खास नेत्याने संदेश पाठवला आहे, असे म्हणत अजित पवारांचा 2019 मधील जुना व्हिडिओ भरसभेत लावला. त्या नेत्यांचे कार्यकर्तांनीही त्यांचे ऐकवे, असे आवाहनही रोहित पवारांनी केले. त्या व्हिडिओत अजित पवार म्हणतात, बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक जण खासदार झाले. मात्र सुप्रिया सुळे यांचा सर्वात जास्त संपर्क ठेवला आहे. हे माझी बहीण म्हणून सांगत नाही. तिने विकासकामे केली आहेत, असे सांगून अजितदादांनी सुळे यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. हा व्हिडिओ लावून रोहित पवारांनी अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT