Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय अशी टशन आहे. या लढतीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या लढतीत अजित पवार एकीकडे तर संपूर्ण कुटुंब शरद पवारांकडे असे चित्र निर्माण झाले आहेत. अजितदादांनी भावनेला भुलू नका, विकासाला मत द्या, असे आवाहन केले आहे. तर कुठल्याही दबावाला बळी न पडता योग्य निर्णय घ्या, असे आवाहन शरद पवार करत आहेत.
बारामती राखण्यासाठी शरद पवार Sharad Pawar आणि अजित पवारांनी सर्व ताकद लावली आहे. मतदारसंघातील विविध घटकांना सोबत घेण्याची दोन्ही गटात स्पर्धा लागली होती. तसेच अनेक नेत्यांना आपल्या बाजुला घेण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आल्याचेही दिसून आले. अजित पवारांनी बारामतीचा जो काही विकास केला तो मीच केला आहे. त्यासाठी लागणार निधी मी कसा आणला ते मलाच माहीत आहे. विरोधी गट निवडणुकीमुळे आता पायाला भिंगरी लावून फिरत आहे. एकदा निवडणूक झाली तर ते तुम्हाला भेटायला आले तर मी मिशी काढीन, असे चॅलेंजच अजितदादांनी एका सभेत दिले आहे.
अजितदादांनी दिलेल्या या चॅलेंजचा आमदार रोहित पवार Rohit Pawar आणि श्रीनिवास पवार यांनी खिल्ली उडवली आहे. रोहित पवार यांनी बारामतीतील सांगता सभेत ४ जूनला गुलाल उधाळायला तयार राहा, असे विश्वास व्यक्त केला. तर ट्विटद्वारे 4 जूनला अजितदादांना मिश्या काढाव्या लागणार, असा दावा व्यक्त केला आहे. तर सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनीही एका यूट्यूबला दिलेल्या मुलाखतीत अजितदादांवर मिशी काढायची वेळ येणार असल्याचे सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
श्रीनिवास पवार म्हणाले, अजितदादा Ajit Pawar शब्दांचे पक्के आहेत. त्यामुळे ते आपला दिलेला शब्द पाळतीलच. मी सोडून येथे सर्वजण राहतात. बारामतीत सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांची घरे बारामतीतच आहेत. मीच फक्त मुंबईला राहतो. इतर सर्व मंडळी बारामतीतच असतात. त्यामुळे अजित पवारांनी माझ्याबाबत बोलले असते तर ठीक होते. आता त्यांना मिशी काढावी लागणार, असा दावाच श्रीनिवास पवारांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.