Rohit Pawar and Rahul Kalate Sarakarnama
पुणे

Rohit Pawar and Rahul Kalate : राहुल कलाटेंच्या प्रचारार्थ रोहित पवार घेणार मेळावा; युवकांशीही संवाद साधणार!

Rohit Pawar Rally For Rahul Kalate in Chinchwad Assembly Constituency : चिंचवड येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचाराच्या पुढील रणनीती ठरवण्यासंदर्भात मार्गदर्शनही करणार आहेत.

Mayur Ratnaparkhe

Chinchwad Assembly Constituency News : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे युथ आयकॉन आमदार रोहित पवार यांचा शनिवारी (ता.९) सायंकाळी पाच वाजता आहेर गार्डन, चिंचवड येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहाराध्यक्ष अ‍ॅड. सचिन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, युवकचे शहाराध्यक्ष इम्रान शेख, युवा सेना प्रमुख चेतन पवार, काँग्रेस युवकचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, मीना जावळे आपचे रविराज काळे, यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात रोहित पवार(Rohit Pawar) युवकांशी खास संवाद साधणार आहेत तसेच महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधन करणार आहेत. प्रचाराच्या पुढील बारा दिवसांची रणनीती ठरवण्यासंदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत.

या आधी मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधताना राहुल कलाटे(Rahul Kalate) यांनी 'आमचे दूरदृष्टी नेतृत्व शरदचंद्र पवार यांनी जागतिक दर्जाचे आयटी हब येथे आणले. त्यामुळे शहराचा कायापालट झाला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी नाकर्तेपणामुळे आयटीची वाट लावली. करदाते आयटीयन्स विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. यातून महाविकास आघाडीच सर्वांची सुटका करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

तसेच 'सध्या आयटी व लगतच्या परिसराला गंभीर वाहतूक समस्येसह अन्य समस्यांनी ग्रासले आहे. ज्याप्रमाणे दूरदृष्टी ठेवून आयटी पार्क आणले जाऊ शकते. त्याचप्रमाणे आयटीतील व आयटीशी संबंधित सर्व समस्यातून केवळ शरद पवारच (Sharad Pawar) सुटका करू शकतात. त्यामुळे शरद पवारांचे तसेच महाविकास आघाडीचे हात बळकट कारण्यासाठी तुमची साथ हवी आहे.' असं राहुल कलाटे यांनी आवाहन केलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT