Nana Patole on Badlapur School News : बदलापूर प्रकरणातील 'त्या' शाळेवर नाना पटोलेंचे जाहीर सभेतून गंभीर आरोप, म्हणाले...

Nana Patole on Badlapur rape case School : 'राज्यातील सरकार 'आरएसएस'ची शाळा आहे म्हणून..' असंही नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole serious allegations against Badlapur school : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. त्या प्रकरणानं संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघालं. आता या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. ते नांदेडमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.

नाना पटोले(Nana Patole) म्हणाले, 'महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील 67 हजार महिला गायब झाल्या आहेत. शाळेत शिकणाऱ्या चार-पाच वर्षांच्या मुली या देखील सुरक्षित नाहीत. बदलापूरमधील शाळेत चार आणि पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला. त्या दोनच नाहीतर तर असंख्य मुलींवर झाला. न्यायालयाने थेट सुमोटो घेत चौकशीचे आदेश आपल्या हाती घेतले आणि जे काही गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली.'

Nana Patole
Shinde Vs Thackeray : महाआघाडीलाच तुमचा चेहरा चालत नाही, महाराष्ट्राला कसा चालेल?; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

याचबरोबर 'राज्यातील सरकार आरएसएसची(RSS) शाळा आहे म्हणून त्यांच्या संचालक मंडळावर कारवाई करायला तयार नाही. चार आणि पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून त्यांची फिल्म तयार करण्यात आली. माहितीच्या अधिकारात केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीने माहिती घेतली आणि त्याने त्या माहितीच्या आधारावर उच्च न्यायालयात केस केली. या केसच्या माध्यमातून या शाळेत काय काय सुरू आहे, त्या मुलींचे ब्ल्यू फिल्म तयार करायचे, त्यांचे पिक्चर तयार करायचे, त्यांच्या शरीराचे भाग विकायचे अशा पद्धतीचा आरोप लावून या केतन तिरोडकरांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.' असंही पटोले यांनी सांगितलं.

Nana Patole
Ambadas Danve News : पालघरला विमानतळाच्या बाता करणाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या फाईलवरची धूळ हटवावी!

याशिवाय 'सांगायचं तात्पर्य असं की लहान-मुली असोत किंवा महिला असोत, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्यावर अन्याय होतो आहे. हे कुठल्या नाकाने भाजपचे(BJP) आणि या महायुतीचे लोक मत मागायला आमच्या भगिनींकडे येतात?' असा सवाल करत पटोले यांनी टीका केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com