Rohit Pawar News : कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ हा परदेशी पळून गेला आहे. घायवळवर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याची चौकशी सुरू आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या काळात रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट मिळवून दिल्याचा आरोप केला होता. शिंदेंच्या या आरोपाला रोहित पवारांनी प्रत्युत्तर देताना विधानसभा निवडणुकीपासून ते घायवळच्या बंदुक लायसन्सपर्यंत सर्वच प्रकरणांवर भाष्य करत प्रत्युत्तर दिले आहे.
एक्स अकाऊंटवर पोस्ट करत रोहित पवार म्हणाले की, 'राम शिंदे सर, पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं, एवढी साधी गोष्ट आपणास कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. घायवळ देशाबाहेर आहे, आपणही मागील काही दिवस देशाबाहेर होतात म्हणून कदाचित अहिल्यानगर एसपीसाहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं, ते आपण नक्की बघा. पासपोर्ट २०२० साली मिळाला तेंव्हा केंद्रात भाजपचं सरकार होतं याचा विसर पडला का?'
'ज्यांना आपण राजरोसपणे विधीमंडळात घेऊन फिरलात, निवडणुकीत स्वतःच्या प्रचारासाठी ज्यांना संपूर्ण मतदारसंघात फिरवलंत, जे जाहीरपणे आपले चरणस्पर्श करतात, ज्यांची जाहिरपणे ओळख आपण इतर आमदारांना करून देतात त्यांच्याशी दूरदूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं? मग दूरदूरपर्यंतचा संबंध नाही तर खूप जवळचा संबंध आहे, असं तर म्हणायचं नाही ना आपल्याला?', असा टोलाही शिंदेंना रोहित पवारांनी लगावला.
'आता प्रकरण अंगलट आल्याने गोल गोल फिरवण्यापेक्षा घायवळने तुमचा प्रचार केला की नाही? तुमच्या बहुतांश सभांमध्ये घायवळने भाषणं केली की नाही? मुख्यमंत्र्याच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलं की नाही? ते सांगा. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे पासपोर्ट कुणी दिला, बंदूक परवान्यासाठी कुणी शिफारस केली या सगळ्याची तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणा. सरकार तुमचं आहे, तर मग घाबरता कशाला?' असे चॅलेंज देखील त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.