Ajit Pawar: अजितदादांची भाजपला टक्कर देण्यासाठी विदर्भात मास्टर खेळी; विधानपरिषदेची आमदारकी दिल्यानंतर खोडकेंकडे नवी जबाबदारी

Amravati NCP Politics : संजय खोडके यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. ते मंत्रालयात नोकरीला होते. तेव्हापासूनच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आले. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या विधानसभेच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.
Ajit Pawar Sanjay Khodke .jpg
Ajit Pawar Sanjay Khodke .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावतीचे आमदार संजय खोडके यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले संघटन महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता त्यांना पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरबुऱ्या, राजीनाराजी आणि अडथळे त्यांना दूर करावे लागणार आहे. खोडके यांची नियुक्ती करून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपाचे प्राबल्य असलेल्या विदर्भात पक्षविस्तार करण्याचे संकेत दिले आहे.

संजय खोडके यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. ते मंत्रालयात नोकरीला होते. तेव्हापासूनच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आले. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या विधानसभेच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट नव्वद टक्के होता. सातपैकी सहा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.

मोर्शी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यात माजी आमदार देवेंद्र भुयार पराभूत झाले. याचं एकमेव अपवाद ठरले. सत्ता स्थापनेनंतर हा स्ट्राईक रेट बघून अजित पवार (Ajit Pawar) यांनी निवड नियुक्त्यांमध्ये विदर्भाला झुकते माप दिले जाईल अशी घोषणा नागपूरमध्ये केली होती. संजय खोडके यांना विधान परिषदेवर घेऊन अजितदादांनी आपला शब्द पाळला. आमदार खोडके यांच्यातील संघटन कौशल्य बघून अजितदादांनी आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर अलीकडेच नागपूरमध्ये पार पडले. या शिबिरात दादांनी पालकमंत्र्यांना पर्यटनासाठी जाऊ नका, असा दम दिला होता. ज्या जिल्ह्याचे पालकत्व तुमच्याकडे सोपवण्यात आले आहे त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाठी वेळ काढा, त्यांची कामे करा, लोकांमध्ये मिसळा असा सल्ला देऊन अजित दादांनी ते जमत नसेल तर पद सोडा असेही पालकमंत्र्यांना बजावले होते.

Ajit Pawar Sanjay Khodke .jpg
Pune Police Action: निलेश घायवळ प्रकरणी मोठी अपडेट; 'पासपोर्ट'साठी व्हेरिफिकेशन केलेले पोलीस सापडले, चौकशीसाठी नोटीसही बजावली

महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषदांचे सर्कल जाहीर झाले आहे. आरक्षणाची सोडतसुद्धा काढण्यात आली आहे. नेत्यांचे वक्तव्य बघता स्थानिक निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता दिसत नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्य असेल तिथेच युती होईल असे सांगून प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संघटनेत नाराजी निर्माण होणार नाही, कोणी सोडून जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

Ajit Pawar Sanjay Khodke .jpg
MNS News: राज ठाकरे महायुतीची झोप उडवणार, मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 70 वॉर्डमध्ये मनसेचा दरारा, तर उद्धव ठाकरेंनाही मोठी संधी

निवडणुकीचा अनुभव, संघटन कौशल्य, सर्वांसोबत असलेले संबंध आणि जुळवून घेण्याची स्वभाव बघून संजय खोडके यांची संघटन महासचिव म्हणून नियुक्ती केली आहे. विशेषतः संपूर्ण विदर्भाचे पालकत्व संजय खोडके यांच्याकडे सोपवण्याची मागणी विदर्भातील पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com