Rupali Chakankar Sarkarnama
पुणे

Rupali Chakankar : 'ते' दोन खासदार दादांमुळे निवडून आले, आता फक्त मोकळ्या खुर्च्या

Roshan More

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये कधी काळी राष्ट्रावादीची मोठी ताकद होती. मात्र, भाजपने या सत्तेला सुरुंग लावला. आता पुन्हा सत्तेत असलेल्या अजित पवारांकडून पिंपरी-चिंचवडमध्ये पक्ष मजबूत करण्यावर भर दिला जातो आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा अजित पवारांच्या उपस्थितमध्ये आज (शनिवारी) मोशीत झाला. या मेळाव्यात रुपाली चाकणकर यांनी खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांना टार्गेट केले.

काही खासदार हा शेतकऱ्यांच्या आक्रोश मेळावा काढतात. ते खासदार अजितदादांमुळे निवडून आले आहेत. त्यांच्या मोर्चात खाली खुर्च्या दिसत होत्या. शेतकरी काही मोर्च्यात दिसले नाहीत. अजित दादासोबत नसतील तर मोकळ्या खुर्च्याच पाहाव्या लागलीत, असा टोला रुपाली चाकणकर यांनीखासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता लगावला.

त्यांनी शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला नव्हता तर,स्वतःसाठी हा आक्रोश मोर्चा होता. आता आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला रुपाली चाकणकर यांनी दिला. प्रभु श्रीराम हे मांसाहारी होते, असे वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील चाकणकर यांनी हल्ला चढवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

22 जानेवारीला देशात आनंदोत्सव साजर होणार असताना मुंब्य्रातील एक व्यक्ती आक्षेपार्ह वक्तव्य करतात. महाराष्ट्रात बदनाम असलेले आता देशामध्ये बदनाम झाले आहेत. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्याऱ्या या व्यक्तीवर कारवाई करावी, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

रुपाली चाकणकर या भाषण करत असतानाच कार्यकर्त्यांनी जोरजोरात 'एकच वादा अजित दादा' असे म्हणत घोषणा देण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांना खाली बसण्याच्या सुचना पदाधिकारी देत होते मात्र कार्यकर्ते आक्रमक होईन घोषणा देतच होते. या सगळ्यात रुपाली चाकणकरांना आपले भाषण काही काळ थांबवावे लागले. कार्यकर्त्यांचे दादांवर प्रेम आहे, असे म्हणत चाकणकर पुन्हा भाषण सुरू केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT