Ruapali Chakankar Resigns sarkarnama
पुणे

Rupali Chakankar Resignation: रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?

Sunetra Pawar Reaction ON Rupali Chakankar resigns:अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावर सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Sudesh Mitkar

Pune News: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काल (शुक्रवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन त्यांनी हा राजीनामा सादर केला. राजीनाम्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याला नाशिकमधील अशोक खरात प्रकरण हे मुख्य कारण ठरले आहे. स्वयंघोषित ज्योतिषी व 'कॅप्टन अशोक खरात' ऊर्फ भोंदूबाबा यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार व फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत.

खरात याला अटक झाली असून, त्याच्या ट्रस्टमध्ये रूपाली चाकणकर विश्वस्त आहेत. त्यांचे एकत्रित फोटो, पाद्यपूजा व्हिडीओ व इतर छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी तीव्र टीका केली व राजीनाम्याची मागणी केली होती.

त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला होता या राजीनामा पत्रात चाकणकर यांनी वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छेने पद सोडत असल्याचे नमूद केले आहे. पत्र सात ओळींचे असून, त्यात खरात प्रकरणाचा किंवा कोणत्याही आरोपाचा थेट उल्लेख नव्हता.

चाकणकर यांनी राजीनामा सोपवल्यानंतर त्या राजीनामावर सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. की त्यांनी याबाबत सोशल मीडिया माहिती दिली असून त्यात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे.

सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT