Ashok Kharat Case Rupali Chakankar Vs Rupali Patil sarkarnama
पुणे

Rupali Chakankar Vs Rupali Patil : सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटमध्ये रुपाली चाकणकर सूत्रधार, महिला नेत्याच्या पत्राने खळबळ, CM फडणवीस दखल घेणार?

Ashok Kharat Case Rupali Chakankar : पत्रात म्हटले आहे की अशोक खरात प्रकरण महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या राज्यातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटमध्ये सुत्रधार असल्याचा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्यांनी या विषयी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित रुपाली चाकणकर यांना सहआरोपी मागणी केली आहे.

पत्राच्या विषयामध्येच त्यांनी लिहिले आहे की, रुपाली चाकणकर हिला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटमध्ये सुत्रधार म्हणून सहआरोपी करणेबाबत.

पत्रात त्यांनी अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करत म्हटले आहे की, प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते.

रुपाली चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला आहे.

रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईल. तसेच भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्वाच्या बाबी मला माहित असून त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा मी आपल्यासमोर करणार असल्याचे रूपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले आहे.

बलात्कारा विषयी माहिती

पत्रात पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, मागील वर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे सदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रुपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे.

पोलिसांवर दबाव टाकला

२९/१२/२०२५ रोजी नाशिक ग्रामीण वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्र. ४६८/२०२५ हा गुन्हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कॅप्टन खरात याचा लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे.

कॅप्टन खरातला वाचवले...

शिर्डी पोलीस स्टेशन येथे फोन करून कॅप्टन खरात याला वाचवले. यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती कि, रुपाली चाकणकर यांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून सत्यपरिस्थिती बाहेर आणून पिडीत महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT