Tanhaji Sawant & Rupali Thombare Patil
Tanhaji Sawant & Rupali Thombare Patil Sarkarnama
पुणे

मंत्री सावंतांच्या दौऱ्याची रूपाली पाटलांनी उडवली खिल्ली; म्हणाल्या, महाराष्ट्राचे वाटोळे...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिंदे-फडणवीस सरकारमधील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanhaji Sawant) यांच्या मुंबई-ठाणे- रायगड-पुणे जिल्हा दौरा कार्यक्रमाची राष्ट्रवादीच्या (NCP) महिला नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी खिल्ली उडवली आहे. (Tanhaji Sawant & Rupali Thombare Patil)

रूपाली पाटील-ठोंबरे यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा दौऱ्याचे वेळापत्रक आपल्या फेसबुक अकाउंट वर शेअर केल आणि हा किती कामाचा दौरा आहे पहा, महाराष्ट्राची वाटोळे करणारे हेच अडाणी लोक घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर, असे कॅप्शन देत त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. मात्र काही वेळाने त्यांनी यातील काही मजकूर काढून टाकत फक्त मंत्री महोदयाचा दौरा घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर.. एवढेच ठेवले आहे.

मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली असून ते शिंदे गटात गेल्याने त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बंडात सामील झाल्याने सावंताना पहिल्याच झटक्यात कॅबिनेट मंत्रीपद मिळाल आहे. मात्र शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेत्यांकडून सावंत यांना सातत्याने लक्ष केले जात आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्येही विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता.

सावंत यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. यामुळे त्यांच्यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. यामुळे त्यांना सातत्याने लक्ष केलं जात आहे. तसेच ते गुवाहीटीला असतांना त्यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला देखील करण्यात आला होता. दरम्यान त्यांच्या जिल्हा दौऱ्यावरून आज रूपाली पाटील यांनीही फेसबुक पोस्टवर त्यांची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, सावंत यांचा 26 ते 28 ऑगस्ट असा तीन दिवसीय दौरा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांचा निवासस्थान ते कार्यालय असेच नियोजन जास्त वेळापत्रकात दिसून येत आहे. यामुळे रूपाली पाटलांनी त्यांच्या या दौऱ्याची खिल्ली उडवली. आणि यावर अनेक नेटकऱ्यांकडून देखील मंत्री सावंत यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आता या टीकेवर सावंत काय प्रत्युत्तर देणार हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT