डोंबिवली : शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या राजकीय पक्षांनी आज (ता.26ऑगस्ट ) युतीची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी आज पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.
दरम्यान या युतीवर मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्विटर आणि फेसबुक पोस्ट करत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाव घेता टीका केली आहे. (Uddhav Thackeray Latest News)
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्याशी हात मिळवणी करत राज्यात नवं राजकीय समीकरण करण्याच्या प्रयत्न केला. यावरूनच मनसे आमदार राजू पाटलांनी हे यांनी ट्विट केल्याचे बोलले जात आहे.
पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, 'सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली...!, अशा शब्दात त्यांनी शिवसेना आणि ठाकरेंना टोला लगावला आहे. यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. मात्र शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युतीची आज घोषणा झाली असून प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर शिवसेनेसोबत का युती केली, याचं कारण संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केलं आहे. या युतीवरूनच पाटील यांनी ट्विट केल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.