Rupali Thombre 
पुणे

Rupali Thombre: भाजपकडून EVM मध्ये फेरफार केल्याचा आरोप; रूपाली ठोंबरेंनी घेतला मोठा निर्णय

Rupali Thombre : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Sudesh Mitkar

Rupali Thombre : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांना यांचा देखील या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. त्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दोन प्रभागातून निवडणूक लढवत होत्या. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

काल मतमोजणीवेळी देखील रूपाली ठोंबरे यांनी मतदान केंद्रावर मोठा गोंधळ घातला होता. लोकशाहीची गळचेपी केली जात असल्याचा आरोप करत EVM मध्ये गडबड घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर आज आपण या विरोधात कोर्टामध्ये दाद मागणार असल्याचं रूपाली ठोंबरेंनी सांगितलं आहे.

याबाबत बोलताना रूपाली ठोंबरे म्हणाल्या, कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपसोबत EVM हेराफेरी, छेडछाडकरून प्रभाग 25, प्रभाग 27 भाजप उमेदवार निवडणून दिले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार करणे गरजेचे होते, ते न करता निवडणूक अधिकारी, भाजप व पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून भाजप उमेदवार निवडून दिले. मतदार लोकांनी आम्हाला भरभरून मते दिले पण मशीन बदलून जिंकणाऱ्या उमेदवार यांना जिंकून काहीही उपयोग नाही. लोकशाहीचा गळा घोटून निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर करून जिंकणे मोठे काम नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

मी लढणारी आहे लोकशाही जिवंत रहावी, कायदेशीर प्रक्रियेने कामकाज व्हावे यासाठी जे जे करावे लागले ते मी केले आणि करणार. कोणाला स्टंट वाटावा कोणाला अजून काही वाटावे तर त्यांनी स्वतः लोकशाही टिकवण्यासाठी कायदेशीर कामकाज होण्यासाठी थोडं तरी आपलं योगदान देण्याचे काम असावे समाजावर उपकार करावे. माझ्या प्रभाग 25 शनिवार पेठ महात्मा फुले मंडई मधील मतदार बंधू भगिनी वडीलधारी मंडळी यांनी पराभूत केले नाही त्यांच्यासाठी कालही होते, आजही आहे आणि उद्याही त्याच ताकतीने राहील असंही रूपाली पाटील म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT