Bidkar vs Dhangekar Election Analysis : बिडकर विरुद्ध धंगेकर; पुण्याच्या राजकीय आखाड्यात धंगेकर 'पॅटर्न फेल'; बिडकरांच्या ‘या’ रणनीतीने मारली बाजी!

Maharashtra political strategy comparison : बिडकर आणि धंगेकर यांच्यातील लढतीचे सखोल विश्लेषण. बिडकर पॅटर्न का यशस्वी ठरला आणि धंगेकर पॅटर्न का फेल झाला, जाणून घ्या सविस्तर.
Ganesh bidkar, Ravindra Dhangekar
Ganesh bidkar, Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेच्या लढतीमध्ये बिडकर विरुद्ध धंगेकर ही हाय व्होल्टेज लढत चांगली चर्चेत होती. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला अशाच पद्धतीने मोठ यश मिळालं होतं. मात्र एकीकडे हे मोठे यश मिळत असताना. गणेश बिडकर या महापालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या नेत्याचा पराभव रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यामुळे 2026 च्या या निवडणुकांमध्ये धंगेकर पुन्हा विजय साकारणार की बिडकर 2017 चा वचपा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. आता पुण्यातील सर्वच जागांचं चित्र स्पष्ट झाला असून आक्रमक धंगेकर पॅटर्न वर सायलेंट बिडकर पॅटर्न वरचढ ठरला असल्याचं पाहायला मिळत आहे.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर पॅटर्न चर्चेत आला. यावेळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात धंगेकर यांनी विजय साकारल्यामुळे सबंध महाराष्ट्रात चर्चा झाली. त्यावेळी धंगेकर यांना कॉमन मॅन म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलं होतं. जो माणूस सामान्य लोकांच्या हाकेला धावून जातो. तसंच मतदार संघामध्ये स्कूटर वर फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतो. त्यांच्या या कॉमन मॅनच्या इमेजमुळे त्या निवडणुकीत त्यांना मोठा असे यश देखील मिळालं.

Ganesh bidkar, Ravindra Dhangekar
Chhagan Bhujbal Politics : छगन भुजबळांची अनुपस्थिती; नेतृत्वहीन अजित पवारांची राष्ट्रवादी ठरली प्रभावहीन!

मात्र कसबा पोटनिवडणुकीत ज्या धंगेकर पॅटर्न वर त्यांनी विजय मिळवला होता. तो धंगेकर पॅटर्न नंतरच्या काळात बदलण्याचा पाहायला मिळालं. आमदार झाल्यानंतर धंगेकरांचे दंगे जास्त चर्चेमध्ये राहिले. या दंग्यांमुळे माध्यमांमध्ये धंगेकर सातत्याने दिसून आले ते मोठमोठ्या नेत्यांवरती सडकून टीका करताना पाहायला मिळाले. मात्र यामुळे कुठेतरी त्यांची कॉमन मॅन ही छबी धूसर होत गेली असल्याचे देखील पाहायला मिळालं. सुरुवातीला त्याचा फटका त्यांना सुरवातीला लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये बसला आणि आता महापालिका निवडणुकीत देखील त्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा पराभव झाला आहे. त्यामुळे धंगेकर यांचा बदललेला पॅटर्न लोकांना आवडला नसल्याचे निवडणूक निकालात न पाहायला मिळत आहे.

तर 2017 च्या निवडणुकांमध्ये देखील गणेश बिडकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकींची रणनीती आखली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर येतील त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून महापालिकेत सभागृह नेते पद देण्यात आलं होतं. आणि यंदा देखील भाजपने त्यांच्यावर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. एकीकडे पुणे शहराची रणनीती आखत असताना दुसरीकडे गणेश बिडकर यांच्याकडून प्रभागांमध्ये देखील आपलं जनसंपर्क वाढवण्याचं काम सुरू केलं होतं. निवडणुकीपूर्वीच काही महिने ते लोकांशी वन टू वन कनेक्ट होते जास्तीत जास्त लोकांच्या घरी जाऊन भेटी देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात होता.

Ganesh bidkar, Ravindra Dhangekar
Asif Shaikh Politics: मालेगाव महापालिकेत "इस्लाम" पक्षाचा उदय; भाजपच्या पथ्यावर?

ज्या चुका त्यांनी 2017 च्या निवडणुकीमध्ये झाल्या होत्या त्या चुका कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून केला. तसेच निवडणुकीदरम्यान धंगेकर टीकेची झोड उठवल्यानंतर देखील त्यावर बिडकर यांनी समोर येऊन कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एक प्रकारे धंगेकरांना माध्यमांचे कव्हरेज कमीत कमी कसे मिळेल याकडे त्यांनी भर दिला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये धंगेकरांनी काही व्हिडिओच्या माध्यमातून बिडकर यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न केला. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता बिडकर यांनी प्रचारावर भर दिला. त्यामुळेच धंगेकरांच्या आक्रमक पॅटर्नला काउंटर करण्यासाठी बिडकर यांनी सायलेंट पॅटर्न वापरल्यानं यंदाच्या निवडणुकीत विजयी झाले असल्याचे पाहायला मिळालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com