Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar Latest News
Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar Latest News sarkarnama
पुणे

संभाजीराजेंना अद्याप पाठिंबा नाही; अजित पवार आणि जयंत पाटील मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठिंबा दिल्याचा दावा संभाजीराजे समर्थकांकडून करण्यात येत आहे. याबाबत काही बातम्याही प्रसारीत झाल्या आहेत. मात्र, अद्याप संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत निर्णय झालेला नसल्याचं राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. (Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar Latest News)

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संभाजीराजेंना राष्ट्रवादीचा आणि महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचा दावा संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे. शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ, असे पवारांनी नांदेडमध्ये सांगिलतं होतं, असा दावा समर्थकांकडून करण्यात आला आहे. मात्र, सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप राष्ट्रवादीकडून संभाजीराजेंना पाठिंबा देण्यात आला नसून या सहाव्या जागेबाबतचा निर्णय राष्ट्रवादी ,काँग्रेस आणि शिवसेने कडून एकत्र घेण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारअसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे संभाजीराजेंचा खासदारकीचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.

संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा व्यक्त केल्याचा दावा संभाजीराजे समर्थकांकडून करण्यात आलायं मात्र, याबाबत अद्याप अधिकृत कुठलाही निर्णय झालेला नाही.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे २७ मते शिल्लक राहतात तर, पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण ४६ मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता असून महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत जाऊ शकतात पवारांच्या या पाठिंब्यावर संभाजीराजेंचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा मात्र समर्थकांकडून करण्यात आला तर याबाबतच्या काही बातम्याही प्रसारीत झाल्या आहेत. मात्र, अद्यापही याबाबत स्पष्ट निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT