मोठी बातमी : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संभाजीराजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा?

संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे.
Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar Latest News
Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar Latest Newssarkarnama

पुणे : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचं जाहीर केल आहे. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केल्याचा दावा संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे.

शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ,असे शरद पवारांनी नांदेडमध्ये सांगिलतं होतं याबाबत पवारांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिल्याचं समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. (Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar Latest Marathi News)

Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar Latest News
मुख्यमंत्र्यांची सभा ऐकताना राणे घड्याळ लावून बसले होते! त्यांनीच सांगितलं कारण

छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा व्यक्त केला, असा दावा समर्थकांचा आहे.

Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar Latest News
युक्रेनचं मोठं यश! रशियाच्या सैन्याला सीमेपर्यंत मागं पिटाळलं

पवार म्हणाले होते की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. या व्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ, अशी स्पष्ट भूमिका पवारांनी मांडली असल्याचे संभाजीराजे समर्थकांकडून सांगण्यात आले.

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे २७ मते शिल्लक राहतात तर, पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण ४६ मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता असून महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत जाऊ शकतात दरम्यान शरद पवारांच्या या पाठिंब्याच्या जोरावर संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा समर्थकांनी केला आहे.

Sambhajiraje Chhatrapati, Sharad Pawar Latest News
केतकी चितळेसाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान उतरले मैदानात

दरम्यान, संभाजीराजेंना महाराष्ट्रातून पहिला पाठिंबा उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी जाहीर केला आहे. संभाजीराजेंनी या पाठिंब्याबद्दस आमदार बालदी यांच्या उरण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार मानले, यावेळी बालदी यांनी संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून पहिली स्वाक्षरी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com