Rupali Chakankar News : Sarkarnama
पुणे

Rupali Chakankar News :'दादा रुपालीताईंना आवरा..' काँग्रेसच्या महिला नेत्याने सुनावलं ..!

Sudesh Mitkar

Pune Lok Sabha Constituency : लोकसभा उमेदवाराच्या प्रचारासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप पुणे शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी आक्षेप घेत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. यंदा बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. त्यामुळे सहाजिकच हा सामना चांगलाच अटीतटीचा होणार (Baramati) आहे.अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी आपली ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोन गटात विभागले गेले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खडकवासला मतदारसंघातील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे सहाजिकच चाकणकर या अजित पवारांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची जबाबदारी पार पाडत आहेत.रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुद्धा आहेत.आयोगाच्या कार्यालयात त्यांनी सुनेत्रा पवारांची प्रसिद्धी पत्रक वाटल्याचा आरोप करत काँग्रेसच्या संगीता तिवारी यांनी करत चाकणकर यांच्यावर आक्षेप घेतला आहे. याबाबतची तक्रार तिवारी यांनी थेट निवडणूक आयोगाला केली आहे.

याबाबत संगीता तिवारी म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) या शासकीय पदाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. खरे तर एका संविधानिक पदावर असंविधानिकपणे त्या बसल्या आहेत. परंतु आता तर निवडणूक काळामध्ये त्यांनी कहरच केला आहे.

त्यांनी त्यांच्या शासकीय बॅनर आणि लोगो सह आपल्या कार्यालयात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारा करताना ची पत्रके वाटत असतानाचा एक व्हिडिओ, एक रिल आणि आठ दहा फोटो त्यांच्याच महिला उपाध्यक्षाने फेसबुकवर पोस्ट केला आहे. निवडणूक काळामध्ये शासकीय लोगो वापरणे शासकीय बॅनर वापरणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे महिला आयोग अध्यक्ष चाकणकर यांच्यावर तातडीने आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

(Edited by - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT