Sangram Thopate and Ajit Pawar .jpg Sarkarnama
पुणे

Sangram Thopate Defeat : अजितदादांनी अखेरच्या क्षणी टाकलेला डाव थोपटेंना पडला भारी; 45 वर्षांची सत्ता संपुष्टात

Bhor Assembly Election 2024 : भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून चौथ्यांदा संग्राम थोपटे निवडणूक रिंगणात होते. भोर विधानसभा मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष काँग्रेसचा गड बनला होता. त्यामुळे या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार देण्याचा आव्हान महायुती समोर होतं.

Deepak Kulkarni

Pune News : पुणे जिल्ह्यातील भोर, राजगड (वेल्हा) मुळशी विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा गड बनला होता. भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजेच भोर असं गेल्या अनेक वर्षाचे समीकरण बनलं होतं. त्या ठिकाणी संग्राम थोपटे (Sangram Thopate) त्यांचा पराभव करणे हे जवळपास अशक्य असल्याचं निवडणुकीपूर्वीपर्यंत बोललं जात होतं. मात्र, अजित पवारांनी उमेदवार देताना शेवटच्या वेळी खेळी केली आणि काँग्रेसचा गड असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघ काबीज केला.

भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून चौथ्यांदा संग्राम थोपटे निवडणूक रिंगणात होते. भोर (Bhor) विधानसभा मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष काँग्रेसचा गड बनला होता. त्यामुळे या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार देण्याचा आव्हान महायुती समोर होतं. हा मतदारसंघ आपल्याकडे राखावा यासाठी भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी इच्छुक होती.

भाजपमधून माजी नगरसेवक किरण दगडे पाटील तर शिंदेंच्या शिवसेनेकडून कुलदीप कोंडे आणि बाळासाहेब चांदेरे इच्छुक होते. अजित पवार यांच्याकडून रणजीत शिवतारे देखील निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होतं. आतापर्यंत महायुतीमध्ये ही जागा सातत्याने शिवसेनेकडे राहिली होती. त्यामुळे यंदा देखील शिंदे यांच्या शिवसेनेला ही जागा सुटेल असं बोललं जात होतं. मात्र ऐन वेळेस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटल्यामुळे या ठिकाणी रणजीत शिवतारे हे उमेदवार होतील असं मानलं जात असतानाच अजित पवारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोरी केलेले जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या सप्राईज उमेदवारीने सर्वच आवक झाले आहेत. यामुळे नाराज झालेल्या किरण दगडे पाटील आणि कुलदीप कोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवत मांडेकरांचा आव्हान अवघड केलं. मात्र तरी देखील मांडेकरांनी अखेर बाजी मारली.

अजित पवारांनी यंदा या मतदारसंघांमध्ये उमेदवार देताना भोर परिसरातला न देता तो मुळशी भागातला दिला. यंदा मुळशी भागातलं मतदान देखील भोर तालुक्यापेक्षा जास्त होतं. त्यामुळे मुळशीतून चांगलं मताधिक्य घेतल्यास संग्राम थोपटे यांचा पराभव होऊ शकतो हे सूत्र मनाशी बाळगून अजित पवारांनी मुळशीचा उमेदवार दिला.

त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच मुळशी येथील उमेदवार मिळाल्याने मुळशीकरांनी मांडेकरांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिलं. मुळशी परिसरातून मांडेकर तब्बल 60 हजारांनी थोपटेंपेक्षा पुढे राहिले. मात्र जेव्हा भोर आणि राजगड तालुक्याच्या परिसरातील मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा मांडेकरांचं लीड हे कमी झालं तरीदेखील मांडेकर यांनी तब्बल वीस हजारांनी विजय मिळवला.

यापूर्वी संग्राम थोपटे हे सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजयी होत आले आहेत. पूर्वी त्यांचे वडील अनंतराव थोपटे देखील सहा वेळा या मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. त्यामुळे तब्बल 45 वर्ष या मतदारसंघातील सत्ता ही एकाच घरात राहिली होती मात्र या निवडणुकीमध्ये बोरवेला मुळशी विधानसभा मतदारसंघातील लोकांनी बदल घडवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT