Katol Assembly Election 2024 : काटोल विधानसभा मतदारसंघ आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) असे समीकरणच झाले होते. 1995 पासून या मतदारसंघात देशमुख हेच निवडूण येत होते. फक्त 2014 मध्ये अनिल देशमुख यांचा त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी पराभव केला होता. मात्र, मतदारसंघावर राज्य देशमुख यांचेच होते.
यावेळी मात्र देशमुखीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे चरणसिंग ठाकूर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांचा पराभव केला आहे. चरणसिंग ठाकूर हे २७ हजार मतांच्या आघाडीवर आहे. ही आघाडी आता भरून निघणे अवघड आहे. त्यामुळे कमळाने मतदारसंघात जल्लोष उधळणे सुरू केले आहे.
अनिल देशमुख 1995 मध्ये सर्वप्रथम अपक्ष म्हणून निवडून आले होते. युती सरकारमध्ये ते मंत्री झाले. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले, तेव्हापासून ते सातत्याने मंत्री आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ते गृहमंत्री होते. ते पुन्हा लढतील आणि निवडून येथील अशीच अपेक्षा सर्वांना होती.
मात्र, मुलाच्या हट्टामुळे त्यांनी आपला एबी फॉर्म सलील देशमुख यांना दिला. येथेच त्यांचा घात झाल्याचे बोलले जात आहे. चरणसिंग ठाकूर आणि अनिल देशमुख यांच्यात 2019 मध्ये सामना झाला होता. ही निवडणूक देशमुख यांनी सुमारे 17 हजार मतांनी जिंकली होती.
गृहमंत्री असताना देशमुख यांना तुरुगांत टाकण्यात आले होते. ते १४ महिने तुरुंगात होते. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी सहानुभूती होती. सलील देशमुख यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्या गाडीवर दडफेक झाली होती. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. ही घटनाही सलील देशमुख यांना वाचवू शकली नाही. काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत भाजप दुसऱ्यांदा निवडूण आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.