Sangram Thopte-Shankar Mandekar Sarkarnama
पुणे

Bhor Panchayat Samiti Election : संग्राम थोपटेंना मोठा धक्का, भोर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा सभापती! मांडेकरांना 'चिठ्ठी'ची साथ

Sangram Thopte Vs Shankar Mandekar : भोर नगरपालिकेचे अध्यक्षपदापाठोपाठ आता पंचायत समितीचे अध्यक्षपद देखील हातातून गेल्याने माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

Sudesh Mitkar

Pune News : भोर पंचायत समिती सभापती पदाची निवड आज पार पडली. या निवडी दरम्यान मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. भोर पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने अखेर ही निवडणूक 'ईश्वरी चिठ्ठीवर' निश्चित करण्यात आली आहे.

पंचायत समितीचे सभापतीपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव आहे. तालुक्यात एकूण 8 गण असून, त्यात दोन्ही पक्षांचे समबळ आहे. राष्ट्रवादीकडून तृप्ती खुटवड व मनीषा कंक, तर भाजपकडून गीता आंबवले व सुषमा चव्हाण या चार महिला उमेदवार रिंगणात होत्या.

मात्र, संख्याबळ ४-४ असे बरोबरीत असल्याने चिठ्ठीद्वारे नशीब आजमावण्यात आले. आणि नशिबाने साथ राष्ट्रवादी काँग्रेसला दिली असून मनिषा कंक यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित झाला असून विशाल कोंडे हे उप सभापती झाले आहेत.

भोर नगरपालिकेचे अध्यक्षपदापाठोपाठ आता पंचायत समितीचे अध्यक्षपद देखील हातातून गेल्याने माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.तर आमदार शंकर मांडेकर यांना नशिबाची साथ मिळाल्याचे बोलले जात आहे.

सलग तिसरे अपयश

विधानसभा निवडणुकीमध्ये थोपटेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर त्यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या नेतृत्वात भोर नगरपालिका निवडणूक लढली गेली त्या निवडणुकीमध्ये देखील मांडेकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष निवडून आला होता. त्यानंतर आता भोर पंचायत समिती वर देखील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT