पुणे : 'पवार साहेब कुठे? तुम्ही कुठे? कुठे हिमालय कुठे टेकडी, टेकाड, टेंगुळ हे बोलायला चंद्रकांत पाटील यांना बोलायला शोभते का? अशा शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय (Sanjay Raut) राऊत यांनी चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बद्दल केलेल्या एकेरी टीकेचा समचार घेतला आहे.
राऊत म्हणाले, काल शरद पवारांविषयी चंद्रकात पाटलांनी ज्या शब्दात त्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. चंद्रकांत पाटील ते कुठे ? तुम्ही कुठे ? पवार साहेब हिमालय तर, तुम्ही टेंगुळ आहात. शरद पवार साहेबांद्दल असे बोलायला शोभते का? अश्या शब्दात पाटील यांना सुनावले. राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष व शरद पवार यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलतांना "राज्यात पवार आपल्याला चॅलेंज नाही आहे. ५४ आमदारांच्या वर जाऊच दिले नाही त्याला' सगळ आयुष्य गेल तरी ६० आमदारांच्या वर क्रॅासच होऊ दिल नाही. अशी एकेरी टीका केली होती. पाटील यांच्या या वक्तव्याला मात्र, राऊत यांनी चांगलेच खरमरीत उत्तर दिले आहे.
दरम्यान राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजप, केंद्र सरकार व किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, ईडी, सीबीआयला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप पॉवरफुल्ल लोक आहेत. अतिरेकी पळून जातील. आमच्यावर ज्याप्रकारे ईडी, सीबीआयच्यामाध्यामातून हल्ला केला जात आहे. या सरकारी संस्था केंद्र सरकारने बदनाम केल्या आहेत. तसेच, किरीट सोमय्यांनाही काश्मीरमध्ये पाठवा. आम्ही अतिरेक्यांची कागदपत्रे देऊ. ते फिरत बसतील काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला. अशी थेट टीकाही राऊत यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.