Shrirang Barane, Sanjay Raut Sarkarnama
पुणे

Sanjay Raut News : खासदार बारणे गुंड आहेत का, राऊत असे का बोलले? त्यांच्या विधानाने वेगळीच चर्चा...

Uttam Kute

Pimpri News : पुण्याचे नवे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी चार्ज घेताच लगेच शहरातील नामचीन गुंडाची परेड केल्याने त्याची चर्चा झाली. पण त्यानंतर लगेचच परवा दि. 9 रोजी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या मोटारीवर पुण्यात भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

त्यामुळे या राजकीय गुंडांची सुद्धा पुण्यातील रस्त्यावरुन परेड करुन दाखवा, असे खुले आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पोलिस आयुक्तांना दिले. पुणे पोलिसांनी गुंडाची केलेली परेड हा मोठा शो आणि नौटंकी असून ती बंद करा आणि वागळेंवर हल्ला केलेल्यांना हातकडी घालून पुण्यातील रस्त्यावरून फिरवा. तरच तुम्ही सीपी. नाहीतर भाजपचे कार्यकर्ते, असे आव्हानही राऊत यांनी आयुक्त अमितेशकुमार यांना दिले.

निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरींवर हल्ला केलेल्या राजकीय गुंडांची खरं तर अशी परेड काढायला हवी होती. ती का काढली नाही ? घाबरले का सीपी. का त्यांच्यावर राजकीय दबाब आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. या गुंडांचं काय झालं, अशी विचारणा करीत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थन करीत असल्याचा सनसनाटी आरोप राऊतांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, कुख्यात गुंडोबरोबर मुख्यमंत्री, त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत यांचे फोटो ट्विट करण्याचे राऊतांचे सत्र सुरुच आहे. छोटेमोठे तर अनेक गुंड त्यांच्याकडे असून फक्त मोठ्या गुंडांचेच फोटो टाकत असल्याचा खुलासा त्यांनी केला. असे अनेक फोटो आपल्याकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मारणेंबरोबर बारणेही यादीत...

पुण्यातील कुप्रसिद्ध गजानन मारणेसह शहरातील इतर सर्व गुंडाची पोलिसांनी चार दिवसांपूर्वी परेड केली. त्याचा उल्लेख करताना पोलिस आयुक्तांनी मारणे, फारणे, बारणे, झारणे... अशा गुंडाची परेड काढली, असे राऊत म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर पुणे नाही, तर पिंपरी - चिंचवडमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

उद्योगनगरीचे प्रतिनिधीत्व करणारे मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदेसोबत गेल्याने ठाकरे शिवसेनेच्या राऊतांच्या गुंडाच्या यादीत मारणेंबरोबर बारणेंचेही नाव आले असावे, अशी चर्चा रंगली.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT