Devendra Fadnavis : फडणवीसांसाठी कोण बनलंय जग्गा जासूस?

Abhieshk Ghosalkar : घोसळकरांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि वडेट्टीवारांचा समाचार घेतला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना ( ठाकरे गट ) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर ( Abhiesh Ghosalkar ) यांच्या हत्येनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावर उद्धव ठाकरेंना गेट वेल सून म्हणत सनसनाटी आरोप करण्यासाठी राज्यात गोपीचंद जासूस आणि जग्गा जासूस तयार झाल्याचा टोला फडणवीसांनी वडेट्टीवारांना लगावला आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Devendra Fadnavis
Ahmednagar News : "तुम्ही ओरबाडून सत्ता मिळवली, पण आता...", भाजप आमदाराची थोरातांवर टीका

'फडणवीसांची मानसिक स्थिती स्थिर नाही. राज्याला मनोरूग्ण गृहमंत्री लाभलाय,' असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला होता. यावर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, "उद्धव ठाकरेंची भाषा आणि शब्द पाहता वाटते की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी त्यांच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. फक्त ईश्वराकडे एवढीच प्रार्थन करेल की गेट वेल सून."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'घोसाळकरांच्या हत्येमागे सत्ताधारी गटातील महिला किंवा पुरूष प्रवक्ता आहे,' असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला होता. यावर फडणवीसांनी म्हटलं, "कोणीही उठून गोपीचंद जासूस आणि जग्गा जासूस बनत आहे. वडेट्टीवारांना फारसे काही माहित नसते. उगाच काहीतरी सनसनाटी बोलत असतात. घडलेल्या गुन्हेगारी घटना गंभीर आहेत. पण, त्या वैयक्तिक वैमनस्यातून घडल्या आहेत. त्यामुळे त्याचा थेट कायदा व सुव्यवस्थेशी संबंध जोडणे आयोग्य आहे. या प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई आणि कडक कारवाई करण्यात येईल."

Devendra Fadnavis
Sanjay Raut : "फेकूचंद मुख्यमंत्र्यांवर कोण विश्वास ठेवणार, ते...", राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीसांकडून मतांची पेरणी

दरम्यान, आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या मेळा बस स्थानकासह विविध प्रकल्पांचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. मेळा बस स्थानकाच्या आवारातच पार पडलेल्या सभेदरम्यान फडणवीसांनी लोकसभेची मत पेरणी केली. "आगामी तीन वर्षात नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलला जाईल," असे फडणवीस म्हणाले.

( Edited By : Akshay Sabale )

Devendra Fadnavis
Rajya Sabha Election : महाविकास आघाडी उमेदवार उतरवणार? राज्यात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण रंगणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com