sanjay raut and Ashish Shelar Sarkarnama
पुणे

Ashish Shelar : संजय राऊत पाकिस्तानला समर्पित अशी भूमिका घेतायेत का? आशिष शेलारांचा सवाल

Ashish Shelar questions Sanjay Raut News : संजय राऊत हे पाकिस्तानला समर्पित अशी भूमिका घेतायेत का ? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 26 भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर सरकारने जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका घेतली असली तरी आत्तापर्यंतच्या सरकारच्या ध्येय धोरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने टीका करत आहेत. मात्र, संजय राऊत घेत असलेल्या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. संजय राऊत हे पाकिस्तानला समर्पित अशी भूमिका घेतायेत का ? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, 'आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण दिन म्हणून लिहावा असा दिवस आहे. कारण भारत सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. मात्र, काँग्रेसने (Congress) ती मागणी कधीच पूर्ण केली नाही.'

2010 मध्ये काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जातीनिहाय जनगणनेबाबत कॅबिनेट विचार करेल, असे सांगितले मात्र निर्णय घेतला नाही. त्या जागी तत्कालीन सरकारने सर्वे केला मात्र त्या सर्वेमध्ये देखील आठ कोटींच्या वर आकडे चुकले, याची कबुली देखील तत्कालीन सरकारने दिली होती, असे शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

आता केंद्रातील सरकारने जनगणना आणि जातीय निहाय जनगणना ही एकत्रित करण्याचं ठरवले आहे. वेगळया पद्धतीने ही जनगणना करण्यात येणार आहे. यामुळे विकासाची नवीन दालन उघडली जातील. सबका साथ सबका विकास हे खऱ्या अर्थाने साध्य होईल. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे आशिष शेलार म्हणाले.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. त्यावर बोलताना शेलार म्हणाले, 'संजय राऊत या हल्ल्याचं राजकारण करत आहेत. त्यांची निदा करावी तेवढी कमी आहे. ज्या वेळेला संपूर्ण देश एकत्र आहे, असा जगभरामध्ये संदेश जात आहे. मात्र, नेमकी विरोधात भूमिका घेताना संजय राऊत दिसत आहेत. पाकिस्तान व जगाला सांगू पाहत आहेत की भारतामध्ये मतभेद आहेत. अशा प्रकारची भूमिका संजय राऊत का? घेताहेत त्यांच्या भूमिकेत पाकडी रंग तर नाही ना ? असे नागरिकांना वाटत असल्याची टीका अशी शेलार यांनी केली. संजय राऊत यांनी देशहितासाठी एकत्र यावे आणि मग भाष्य करावे, असा खोचक सल्ला शेलार यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT