Sanjay Raut On PM Narendra Modi  Sarkarnama
पुणे

Sanjay Raut News : राऊतांची तोफ पुन्हा मोदींंवर धडाडली; म्हणाले, "या आधी देशाला दिलेल्या गॅरंटीचं काय...?"

Pune Shivsena Melava : " कुठलीही एक निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणुक घेऊन दाखवाच..."

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील दमदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी लोकसभेसाठी दंड थोपटले आहे. याचवेळी त्यांनी निकालानंतर झालेल्या भाजप कार्यालयातील भाषणात मोदी हीच गॅरंटी असल्याचं विधान करत विरोधकांना आव्हान दिले होते. आता मोदींच्या त्याच गॅरंटीच्या आव्हानाला ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊतांनी पलटवार केला आहे. या आधी दिलेल्या देशाला दिलेल्या गॅरंटीचं काय झालं असा सवाल करत राऊतांनी पुन्हा एकदा आपली तोफ पंतप्रधान मोदींवर डागली.

खासदार संजय राऊत हे शनिवारी पुण्यातील शिवसेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात राऊतांनी भाजपसह शिंदे गटाचाही खरपूस समाचार घेतला.ते म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाला गॅरेंटी देत आहेत. दहा वर्षांपूर्वी दिलेल्या गॅरंटीचे काय झाले. किती रुपये खात्यात जमा होणार होते. काळा पैसा परत येणार होता. त्याचे काय झाले, अशी टीकाही त्यांनी केली. केली.

राऊत म्हणाले, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार येईल आणि भाजपचा पराभव होईल, असे आम्हांला वाटत होते. मात्र, इव्हीएम उघडले आणि भाजप आला. फक्त एक निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा.या निवडणुकीचा काहीही निकाल असेल तो आम्ही स्वीकारू, संपूर्ण देश स्वीकारेल असे म्हणत त्यांनी एकप्रकारे भाजपला शिंगावरच घेतले.

तसेच शिवसेना अजिंक्य आहे. शिल्लक शिवसेना काय आहे हे पाहण्यासाठी फडणवीस ही गर्दी पहा. तुमच्याकडे केवळ कचराच गेलाय. आम्हाला शिल्लक शिवसेना म्हणताय, तुम्ही 2024 मध्ये शिल्लक राहणार नाही असा विश्वासही खासदार संजय राऊतांनी यावेळी बोलून दाखवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

" मोदी गया तो..."

बाळासाहेबांच्या कृपेमुळे आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहेत. गुजरात दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी मोदींना हटवणार होते. पण जेव्हा लालकृष्ण अडवाणी बाळासाहेब ठाकरे यांना विचारायला आले. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं, मोदी गया तो गुजरात गया. आज संपूर्ण देश सांगत आहे. नरेंद्र मोदी आले तर देश जाईल. लोकशाही, स्वातंत्र जाईल.

इलेक्शन कमिशन हे मोदी-शाहांचे कमिशन आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मिंधे यांनी ती पळवली. शिवसेना कोणाची आहे हे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राचा धृतराष्ट्र झालेला नाही. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी हा पक्ष त्यांचाच आहे हे सांगण्यासाठी त्यांना इलेक्शन कमिशनच्या ऑफिसला जाऊन बसावे लागते. शिवसेनेसाठी माझी सर्वस्व त्यागाची तयारी आहे. त्या 44 गद्दारांसारखा मी नाही. जेलची भीती मला नाही. शिवसेनेसाठी माझी पुन्हा जेलमध्ये जाण्याची तयारी आहे असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

(Edited by - Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT