Narendra Modi : जागतिक लोकप्रिय नेत्यांमध्ये मोदी कितव्या स्थानी ? 18 टक्के लोकांनी केलं नापसंत...

PM Modi Top Global Leader : मॉर्निंग कंसल्टने केलेल्या सर्वेक्षणात मोदींना 76 टक्के रेटिंग
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

New delhi : पंतप्रधान मोदी केवळ देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत. मॉर्निंग कंसल्टने केलेल्या सर्वेक्षणात मोदी पुन्हा एकदा जागतिक लोकप्रिय नेत्यांमध्ये शीर्षस्थानी आले आहेत, त्यांना 76 टक्के रेटिंग मिळाली आहे. अमेरिकन कंन्सल्टन्सी फर्मच्या 'ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकर'नुसार, भारतातील 76 टक्के लोक पीएम मोदींचे नेतृत्व स्वीकारतात, तर 18 टक्के लोकांना त्यांचे नेतृत्व आवडत नाही. तर सहा टक्के लोकांनी यावर कोणतेही मत दिले नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

रेटिंगच्या बाबतीत पंतप्रधान मोदींच्या जवळही कोणी नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मोदी नंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे सर्वेक्षणात दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांना ६६ टक्के रेटिंग मिळाले आहे. तिसर्‍या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट यांना 58 टक्के रेटिंग मिळाली आहे. मागील सर्वेक्षणांमध्ये ही पंतप्रधान मोदी हे जागतिक रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Rajesh Kshirsagar : युवासैनिकांना हाकलून देण्याचे आदेश मातोश्रीवरून आले...

या जागतिक नेत्यांचे स्थान काय ?

जगातील मोठ्या देशांचा विचार केला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना ३७ टक्के, तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना ३१ टक्के आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना २५ टक्के रेटिंग मिळाली आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना सर्वेक्षणात केवळ 24 टक्के रेटिंग मिळाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी भाषिक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींचे सर्वोच्च रेटिंग समोर आले आहे. 2024 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षासाठी ही मोठी चालना म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी नुकतेच दुबई येथे झालेल्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज क्लायमेट अॅक्शन समिटमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी मोदी म्हणाले, भारत अशा काही देशांपैकी एक आहे जे हवामान बदलाचा सामना करण्याच्या प्रयत्नांमध्ये राष्ट्रीय निर्धारीत योगदान पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. ग्लोबल साउथच्या देशांवर हवामान बदलाचा मोठा परिणाम झाला आहे. हवामान बदलामध्ये भारतासह ग्लोबल साउथच्या देशांची भूमिका छोटी आहे, परंतु त्यांच्यावरील हवामान बदलाचा प्रभाव खूप जास्त आहे.

Narendra Modi
Eknath Shinde : ठाकरे गटाने काढले हुकमी अस्त्र; शिंदेंवर बाजी उलटणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com