Income Tax raid on Nimbalkar's house Sarkarnama
पुणे

Income Tax raid : घरवापसी पूर्वीच घुसले इन्कम टॅक्सचे अधिकारी, 30 तासानंतर ही निघेणात बाहेर, दादांच्या निकटवर्ती याची कोंडी?

Income Tax raid on Nimbalkar's house : फलटण तालुक्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने रेड टाकली आहे.

Aslam Shanedivan

Pune News : फलटण तालुक्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने मंगळवारी (ता.4) छापा टाकला होता. त्यानंतर 30 तास उलटल्यानंतर देखील अद्यापही हे अधिकारी पुण्यातील त्यांच्या घरात ठाण मांडून असून कसून चौकशी करत आहेत.

संजीवराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील प्रभात रोडवर असलेल्या लक्ष्मी या निवास स्थानावर आज सलग दुसऱ्या दिवशी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. बुधवारी (ता.5) सकाळी ६ वाजता दरम्यान पुणे आणि फलटण येथील घरावर इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकले होते. या धाडी दरम्यान मोठ घबाड अधिकाऱ्यांच्या हाती लागला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून निंबाळकर यांची मागील 30 तासांपासून कसून चौकशी सुरू आहे.

फलटण येथे बुधवारपासून इन्कम टॅक्स विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा इन्कम टॅक्स विभागाचे कर्मचारी संजीवराजे यांच्या बंगल्यातून बाहेर पडले. यानंतर संजीवराजे यांनी बंगल्या बाहेर येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

दरम्यान विधनसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून लांब राहिलेले संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत, असं सांगितलं जातं आहे.

त्यामुळे संजीवराजे नाईक निंबाळकर यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होण्यापूर्वीच त्यांच्या घरात इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी घुसल्याने या कारवाईबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT