Pravin Gopale | Sarpanch Shirgaon Murdered| Pratishirdi Sarpanch Pravin gopale Murder Sarkarnama
पुणे

Sarpanch Shirgaon Murdered : धक्कादायक ! प्रतिशिर्डी शिरगावच्या सरपंचाचे सपासप वार करून निर्घृण खून; परिसरातून हळहळ व्यक्त..

Pratishirdi Sarpanch Pravin gopale Murder : मावळ तालुका हादरला, पाठलाग करून कोयत्याने खून..

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad News : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मावळ तालुक्याच्या (Maval Taluka) शिरगाव ग्रामपंचायतील विद्यमान सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७, रा. खळवाडी, शिरगाव) यांचा निर्घून खून करण्यात आला. तीन अज्ञातांनी धारदार हत्याराने सपासप वार करून गोपाळे यांचा खून केला. ही घटना शिरगाव येथे शनिवारी (दि. १ एप्रिल) रात्री घडली. (Pratishirdi Sarpanch Pravin gopale Murder)

प्रवीण गोपाळे (Pravin Gopale) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) काम करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सक्रिय होते. नुकत्याच राज्यात ग्रामपंचायत निवडणुका (Gram panchayat Election) पार पडल्या होत्या. त्यानुसार शिरगाव या ग्रामपंचायतीचीही निवडणूक पार पडली होती. शिरगाव सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रवीण गोपाळे यांची बिनविरोध सरपंच (Sarpanch) म्हणून निवड झाली होती.

शनिवारी रात्री शिरगाव येथील प्रसिद्ध साई मंदिरासमोर (Shirdi Sai Mandir) ते मित्रांसह गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केला. अचानकच त्या हल्लेखोरांनी हल्ला चढवला. अचानक हल्ला झाल्याने त्यांनी पळापळ सुरू केली. मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार (Koyta Gang) केले. यामध्ये सरपंच गोपाळे गंभीररित्या जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोपाळे यांना तातडीने रुग्णालतात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळवरून पसार झाले आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, पोलीस (Pune Police) घटना स्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर पोलिसांचा सीसीटिव्हीद्वारे (CCTV) शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रवीण गोपाळे यांचा खून कोणत्या कारणावरून झाला. हल्लेखोर कोण आहेत? याची अद्याप समजू शकले नाही. गोपाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होत, तसेच ते शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच असण्याबरोबरच, जमीन खरेदी विक्रीचा (Land business) व्यवसायही करत होते. जमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिरगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. (Pune Crime News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT