Satej Patil statement : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया ही ६० दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे. या संदर्भात गोकुळ दूध संघावर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी महायुती बरोबर महाविकास आघाडीमध्ये देखील आता चक्रे फिरू लागली आहेत. अशातच काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी पुणे येथे बुधवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली.
महायुतीकडून कोणताही बिनविरोधचा प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही, असे सांगत पाटील म्हणाले, ही लढाई आपण शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढणार असून 25 जागा स्वबळावर लढवणार आहोत. गोकुळमध्ये लोकशाही असावी ही आपली पहिल्यापासून भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पॅनल सोबत मी असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोकुळमधून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार केला जावा, इतकीच अपेक्षा घेऊन ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. त्यामुळे गोकुळ मध्ये एकहाती सत्ता असेल तरच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे, असे नमूद करत सतेज पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पैशाचा वापर होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला. ते म्हणाले, पैसे महायुतीकडे आहेत. पैशाचा वापर आमच्याकडे होणार नाही. जाहीरनाम्याच्या माध्यमातून वारंवार सांगितले आहे की, ही लढाई शेतकऱ्यांचं पॅनल विरुद्ध महायुती श्रीमंताचं पॅनल अशी लढाई असेल.
आगामी विधानपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आहे का? यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी मी कधीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट केले. 2028 ची निवडणूक कशी लढायचं हे मला निश्चितपणे माहिती आहे. माझ्यासाठी साडेपाच लाख दुध उत्पादक शेतकरी महत्त्वाचा आहे, असे आमदार सतेज पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.