Pimpri-Chinchwad News : कर थकबाकीदारांच्या मिळकती जप्तीचा बडगा पिंपरी-चिंचवड महापालिकेने वर्षाअखेर नाही, तर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सुरु केला आहे. दुसरीकडे प्रामाणिक करदात्यांच्या प्रती त्यांनी तू करदाता, तू करविता' कृतज्ञता अभियान सुरु करणार आहे. त्याबद्दल नियमित करदात्यांत आनंद व्यक्त केला.
पिंपरी महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad) करसंकलन विभागाद्वारे नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी 'मिम्स' नंतर 'रील्स' स्पर्धेतून आवाहन करण्यात आले. या नावीन्यपूर्ण उपक्रमांना करदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराचा भरणा केला. म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'तू करदाता, तू करविता' ('इच वन थॅंक वन') या अभियानातून प्रशासन आता करदात्यांचे आभार मानणार आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वात ते सुरू करण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षात पहिल्या चार महिन्यांतच पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत तब्बल पाचशे कोटींचा कर जमा झाला आहे. तो भरलेल्या करदात्यांबाबत पालिकेचा करसंकलन विभाग अभियानाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. त्यासाठी समाज माध्यमे, बातम्या, व्हिडिओज, ऑडियो, पोस्टर्स अशी विविध साधने वापरणार आहे.
सुप्रशासनाचे (गुड गव्हर्नन्स) हे एक महत्त्वाचे अंग असून त्यात नागरिकांप्रती पालिकेचे असलेले उत्तरदायित्व अधोरेखित करण्याचा हा आमचा एक नम्र प्रयत्न आहे, असे शेखर सिंह म्हणाले. तर, नागरिकांप्रती असलेली बांधिलकी वाढवायची असेल तर नवनवीन संवादाचे पुल बांधणे आवश्यक असून हे अभियान त्याचाच एक भाग आहे, असे करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सागितले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.