CBI Raid On Anil Ramod  Sarkarnama
पुणे

Anil Ramod News Update: लाचखोर 'आयएएस' अधिकारी रामोड तपासात सहकार्य करत नसल्याचा सीबीआयचा आरोप !

CBI : पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड यांना शुक्रवारी (९ जून) लाच घेतना 'सीबीआय'ने रंगेहाथ अटक केली.

सरकारनामा ब्यूरो

CBI Alligations on Anil Ramod : पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड यांना शुक्रवारी (९ जून) लाच घेतना 'सीबीआय'ने रंगेहाथ अटक केली.त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी आणि कार्यालयात सीबीआयचे छापेमारी करत सहा कोटी ६४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच कार्यालयालयात १ सीलबंद आयफोनही जप्त करण्यात आला आहे. डॉ. अनिल रामोड यांना सीबीआय न्यायालयाने १३ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रामोड (Anil Ramod) यांना 'सीबीआय' न्यायालयात हजर केले असता, या प्रकरणातील तक्रारदार आणि रामोड यांच्यातील संभाषण ध्वनीमुद्रीत करण्यात आले आहे. ते संभाषणाची पडताळणी करण्यासाठी रामोड यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. पण रामोड हे तपासात सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप सीबीआयने न्यायालयात केला आहे.

इतकेच नव्हे तर, अनिल रामोड यांच्या पत्नीच्या नावे कंपनी असून, त्याची महत्त्वपूर्ण कागदपत्रेही सीबीआय-एसीबी रामोड यांच्या घरी आणि सरकारी कार्यालयात सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.  तपासासाठी रामोडला पाच दिवसांची कोठडी मिळावी, अशी विनंती सीबीआयचे वकील अ‍ॅड. अभय अरीकर यांनी न्यायालयात केली. तर रामोड याच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा यांनी बाजू मांडली.

सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भूसंपादन कायद्याशी संबंधित प्रकरणे पाहत असल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. खेड्यातील शेतकरी त्यांच्या जमिनीचा जास्त मोबदला मागत आहेत आणि तक्रारदार अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तसेच सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय महामार्गांनुसार लवाद यांच्याकडे अधिक मोबदला मिळावा म्हणून त्यांची प्रकरणे मांडत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सीबीआयमार्फत पुण्यातील तीन ठिकाणी आरोपींच्या अधिकृत आणि निवासी जागेवर छापेमारी सुरु असून त्यात सहा कोटी रुपयांची रोकड, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या 14 स्थावर मालमत्ता,मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे; गुंतवणूक आणि बँक खात्यांचा तपशीलासह महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT