Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काटे की लढत पाहायला मिळाली होती. या बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या गटात थेट लढत झाली होती. मात्र दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्याने येथील सत्तेचा पेच निर्माण झाला होता. यामुळे सभापती कुणाचा आणि कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता, आज सभापतीनिवडीची कार्यवाही होणार आहे. (Karjat krushi utpanna Bajar Samiti)
आज कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे, या दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. आज सभापतीनिवडीची प्रक्रिया होत असताना, त्या पार्श्वभूमीवर आता फोडाफोडी होणार की ईश्वरी चिठ्ठीने मतदान प्रक्रिया पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज दुपारी कर्जत बाजार समितीच्या सभापतीपदीच्या निवड करण्यात येणार आहे. याआधी जामखेड बाजार समितीवर समसमान जागा निवडून आलेले असताना, ईश्वरीचिठ्ठीच्या निर्णयातून राम शिंदे यांचा सभापती बसला होता, आता मात्र रोहित पवार कर्जत राखतात का? की कर्जत समितीवर राम शिंदे बाजी मारतील हे महत्तवाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.