Alandi sexual assault case Sarkarnama
पुणे

Sexual abuse case in Alandi : आळंदीतील शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार! 2 महाराजांवर गुन्हा दाखल

Sexual abuse case in Alandi : आळंदी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत पंधरा वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी महेश पोपट नरोडे आणि आणि गौरव दत्तात्रय माळी या दोघांवर दिघी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.

विलास काटे

Pune News, 05 Feb : आळंदी (Alandi) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत पंधरा वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी महेश पोपट नरोडे (27) आणि आणि गौरव दत्तात्रय माळी (21) या दोघांवर दिघी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर आळंदीतील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जानेवारी महिन्यापासून अशा अत्याच्याराच्या घटना सतत घडत असून काल पुन्हा अशीच घटना घडल्याने महाराजांच्या गैरकृत्याबाबत आळंदीकरांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जानेवारी महिन्यात घडली. पीडित विद्यार्थी रात्री जेवण करून इतर मुलांसोबत संस्थेत झोपला असताना रात्री बाराच्या सुमारास आरोपी गौरव माळी हा पीडित मुलाजवळ आला आणि त्याच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. यावेळी त्यांनी पीडित मुलाकडे शरीरसंबंधाची मागणी देखील केली. सलग तीन दिवस आरोपी माळीने विद्यार्थ्यासोबत असाच प्रकार केला.

त्यानंतर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती विद्यार्थ्याने महेश नरोडे याला दिली. मात्र, नरोडेने आरोपी माळीवर कारवाई करण्याऐवजी विद्यार्थ्यालाच घरच्या लोकांना घडलेला प्रकार सांगू नको अशी धमकी दिली. त्यामुळे अखेर पीडित मुलाने या संपूर्ण घटनेबाबत दिघी पोलिसांत तक्रार दिली.

आळंदीकरांकडून संताप व्यक्त

दरम्यान तीर्थक्षेत्राचं ठिकाण असलेल्या आळंदीत मागील दोन महिन्यात तिसऱ्यांदा अशी लाजिरवाणी घटना घडल्यामुळे आळंदीतील नागरिकांकडून संताप व्यक्त करत आळंदीतील सर्व वारकरी शिक्षण संस्था बंद करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याआधीच आळंदीतील लोकांनी राज्य महिला आयोगाकडे आळंदीत विविध संस्थांमधून विद्यांर्थ्यांचे होणारे शारिरिक आणि आर्थिक शोषणाबाबत तक्रार केली होती.

तक्रारीची नोंद घेत रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात बैठक घेत संस्थांची तपासणी करून 48 तासात कारवाईचे आदेशही दिले होते. त्यानंतर विविध सरकारी यंत्रणांनी संस्थांची तपासणी करत जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे अहवाल देखील सादर केला होता. मात्र त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली असून मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे सरकारने योग्य ती दखल घेण्याची गरज असल्याची भूमिका आळंदीकरांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT