Shambhuraj Desai- Dhangekar-Andhare
Shambhuraj Desai- Dhangekar-Andhare Sarkarnama
पुणे

Shambhuraj Desai : शंभूराज देसाईंचा धंगेकर -अंधारेंना 3 दिवसांचा अल्टिमेटम,म्हणाले, 'माफी मागा, अन्यथा...'

Sudesh Mitkar

Pune Hit And Run Case News : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने सरकारच्या विविध मंत्र्यांवर आरोप करत आहेत. दोन दिवसांपूर्वी धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर हप्त्याचे रेटकार्ड वाचून दाखवत आंदोलन केले.

या आंदोलनादरम्यान खोक्या वर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा फोटो वापरत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर आता शंभूराज देसाई यांनी या दोन्ही नेत्यांना आपण अब्रू नुकसानी संदर्भातील नोटीस पाठवली असल्याचे सांगितले आहे. तसेच पुढील तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना शंभूराज देसाई म्हणाले, पुण्यातील एक्साइज ऑफिस मध्ये जाऊन ज्या प्रकारे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी माझ्यावर आरोप केले. त्या विरोधात मी माझ्या वकिलामार्फत अब्रू नुकसानी बाबतची नोटीस पाठविली आहे. या ठिकाणी केलेल्या आंदोलना दरम्यान त्यांनी माझ्याबद्दल केलेले आरोप तसेच आंदोलनाच्या दरम्यान वापरण्यात आलेल्या खोक्यावर माझा फोटो लावण्यात आला होता. झालेल्या प्रकाराची या दोघांनी पुढील तीन दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात न्यायालयीन (Court) कारवाई करणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप हे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.अथवा याबाबत त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. फक्त स्टंट करण्यासाठी त्यांनी हा केविलवाना प्रयत्न केला असल्याचे देसाई यांनी सांगितलं. या दोघांनी पुढील तीन दिवसांमध्ये बिनशर्त माफी न मागितल्यास ज्या पद्धतीने ललित पाटील प्रकरणांमध्ये त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. तशीच कारवाई यावेळी देखील करणार असल्याचं देसाई म्हणाले.

तसेच कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे एक्साईज विभागामार्फत पुढील काळामध्ये कशा प्रकारची कारवाई करण्यात येईल याबाबतचे नियोजन करण्यात आलं असून याबाबतची सविस्तर माहिती उद्या घेणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर कोणत्या प्रकारे ही कारवाई केली जाणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात येईल, असं देसाई म्हणाले.

यावर प्रतिक्रिया देताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, एक्साइज विभागाने ज्या पबला परवानगी दिल्या होत्या. ते पब महापालिकेने (PMC) अनधिकृत म्हणून पाडले त्यामुळे यांच्याच मेहरबानीने हे पब सुरू होते ही वस्तुस्थिती खरी आहे.पबला घालण्यात आलेले नियम अटींचे कुठलेही पालन होत नसून यातून कोट्यावधीन रुपयांचा हप्ता वसुलीचे काम सुरू असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. पुणे शहरांमध्ये पब संस्कृती वाढण्यासाठी जे लोक मदत करत आहेत. त्यांच्यावरती शंभूराज देसाईंनी कारवाई करणे आवश्यक आहे.

मी पुणेकरांच्या भावना मांडत असून यात जर चुकीच्या वाटत असतील तर शंभूराज देसाईंनी याबाबत चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र तरीदेखील त्यांनी जर माझ्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याचा प्रयत्न केला. तर मी मिळेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र भविष्यात माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या मी पुढे उघड करीन आणि त्यांचा भंग करेल असा इशाराच धंगेकर यांनी शंभूराजे देसाई यांना दिला आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT