Pune Porsche Accident Update : पब संस्कृतीवर येणार निर्बंध, नाईट लाईफ संदर्भात नवी नियामावली ?

Pune Hit And Run Case : गुरुवारी दुपारी ही बैठक होणार असून या बैठकीत गेल्या काही दिवसांत किती कारवाया झाल्या, किती अनधिकृत पब आहेत त्यांच्यावर नक्की कोणती कारवाई करण्यात आली, याची संपूर्ण माहिती मंत्री देसाई घेणार आहेत.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai Sarkarnama
Published on
Updated on

Pune Porsche Crash News : कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणानंतर पुण्यासह राज्यभरात सर्वत्र वाढत चाललेली पब संस्कृती आणि नाईट लाईफ पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या या नाईट लाईफवर निर्बंध यावेत, असा सूर सामान्य जनतेतून उठू लागल्याने आता जागे झालेल्या राज्य सरकारने याबाबत कडक पावलं उचलण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच नाईट लाईफ संदर्भात नवीन नियमावाली तयार करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन तरुणाला दारु दिल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून (collector) दोन पब वर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्य बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या पब वर एक्साइज विभागांकडून देखील कारवाई करण्यात अली आहे. राज्य सरकारकडून अशा प्रकारची कारवाई सुरू असतानाही विरोधी पक्षाकडून पब च्या माध्यमातून लाखो रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याचा आरोप करत थेट या विभागाचे मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांच्यावरती टीका करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shambhuraj Desai
Ravindra Dhangekar News : 'बाहेरून बंद आतून सुरू...', रवींद्र धंगेकर आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत केली 'ही' मागणी

या प्रकरणांमध्ये सातत्याने विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारची प्रतिमा कुठेतरी मलिन होत आहे. जनसामान्यांमध्ये सरकार हे पब आणि नाईट संस्कृतीला पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेत राज्यातील पब संस्कृती वर निर्बंध आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचे बोलले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री असलेल्या शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी एक्साइज विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. गुरुवारी दुपारी ही बैठक होणार असून या बैठकीत गेल्या काही दिवसांत किती कारवाया झाल्या, किती अनधिकृत पब आहेत त्यांच्यावर नक्की कोणती कारवाई करण्यात आली, याची संपूर्ण माहिती देसाई घेणार आहेत.

याबरोबरच सध्या वाढत असलेल्या नाईट लाईफ संदर्भात नवीन नियमावली तयार करून या प्रकारांना कुठेतरी पायबंद घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज होणाऱ्या या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये शहरातील अनधिकृत पब, बार, परमिट रूम आणि इतर गोष्टींवर कारवाई करताना मनुष्यबळाची असणारी कमतरता भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती देखील करण्याची गरज आहे. याबाबतचा निर्णय देखील या बैठकीत होऊ शकतो असे सांगितले जात आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Shambhuraj Desai
Pune Hit And Run Case : 'बाळा'च्या रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी बाहेरील व्यक्ती 'ससून'मध्ये?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com