Ravindra Dhangekar News : माझा हक्कभंग करणाऱ्याचा मी भंग करेल; धंगेकरांचा शंभूराज देसाईंना इशारा

Congress vs Shivsena Politics : आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर रेटकार्ड वाचून दाखवत विविध आरोप केले होते.
Shambhuraj desai - Ravindra Dhangekar
Shambhuraj desai - Ravindra DhangekarSarkarnama

Pune News : काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांनी धंगेकर यांना नोटीस पाठवणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ते तक्रार करणार आहेत.

त्यामुळे धंगेकर यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होण्याची असल्याचे बोलले जात आहे. त्यावर आता रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी प्रतिक्रिया दिली असून माझा हक्कभंग करणाऱ्याचा मी भंग करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Ravindra Dhangekar News )

Shambhuraj desai - Ravindra Dhangekar
Jitendra Awhad News: कोश्यारी, चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का? आव्हाडांचा भाजपला सवाल

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर काँग्रेसचे (Congress) आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने सरकारमधील विविध मंत्र्यांवर आरोप करत आहेत. त्याचप्रमाणे धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर रेटकार्ड वाचून दाखवत आणि त्यासंदर्भात उत्तर द्या, असा सवाल त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना करत विविध आरोप केले होते. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली असून ते नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे.

यावरती प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर म्हणाले, एक्साईज विभागाने ज्या पबला परवानगी दिल्या होत्या. ते पब महापालिकेने अनधिकृत म्हणून पाडले. त्यामुळे यांच्याच मेहरबानीने हे पब सुरू होते, ही वस्तुस्थिती आहे. पबला घालण्यात आलेले नियम अटींचे कुठलेही पालन होत नसून यातून कोट्यवधी रुपयांचा हप्ता वसुलीचे काम सुरू असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे पुणे शहरांमध्ये पब संस्कृती वाढण्यासाठी जे लोक मदत करत आहेत. त्यांच्यावरती शंभूराज देसाईंनी कारवाई करणे आवश्यक आहे. मी पुणेकरांच्या भावना मांडत असून यात जर चुकीच्या वाटत असतील तर शंभूराज देसाईंनी याबाबत चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करणे आवश्यक आहे.

त्यानंतर त्यांनी जर माझ्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याचा प्रयत्न केला. तर मी मिळेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र, भविष्यात माझ्याकडे खूप सारी गोष्टी आहेत. त्या मी पुढे उघड करीन आणि त्यांचा देखील भंग करेल, असा इशाराच रवींद्र धंगेकर यांनी शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांना दिला.

(Edited By : Sachin Waghmare)

Shambhuraj desai - Ravindra Dhangekar
Pune Hit And Run Case: सापडला तरच चोर.. अन्यथा शिफारसपत्रांचा खेळ जुनाच

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com